मथुरा, 10 सप्टेंबर : श्रीकृष्णाचं जन्मस्थान (Birth place of Shir Krishna) मानलं जाणारं मथुरा वृंदावन (Mathura Vrinavan) हे तीर्थक्षेत्र (Holy Place) म्हणून जाहीर करण्याचा निर्णय़ उत्तर प्रदेश सरकारनं (Uttar Pradesh Government) घेतला आहे. त्यामुळे आता मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरापासून 10 किलोमीटर (10 KM) परिसरातील सर्व मांसविक्री (Meat) आणि मद्यविक्री (Liquor) करणारी दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कृष्ण जन्माष्टमीदिवशी या निर्णयाचं सुतोवाच केलं होतं. श्रीकृष्णाची जन्मभूमी हे तीर्थस्थळ म्हणून जाहीर करण्याची आपली तयारी असून त्यासाठीचा रितसर प्रस्ताव स्थानिक प्रशासनाने तयार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आता औपचारिकता पूर्ण झाली असून मथुरा वृंदावन परिसर तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर झाला आहे.
10 किमी परिसरात मांसविक्री बंद
मथुरेचा परिसर तीर्थक्षेत्र जाहीर झाल्यामुळे आता 10 किलोमीटर परिसरात कुठेही मांस आणि मद्यविक्रीला परवानगी असणार नाही. या भागात सध्या अनेक मांस आणि मद्यविक्री करणारी दुकानं आहेत. या सर्व दुकानांना इतरस्तर हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकार करणार पुनर्वसन
सरकारच्या या निर्णयामुळे मांस आणि मद्यविक्री करणाऱ्या अनेकांचं नुकसान होणार आहे. मात्र अशा सर्व व्यावसायिकांचं पुनर्वसन केलं जाईल आणि कुणाचंही नुकसान होणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. सर्वांनी एकमतानं हा निर्णय घेतला असून व्यापारी याला सहकार्य करतील, अशी अपेक्षा योगी आदित्यनाथांनी व्यक्त केली आहे.
हे वाचा - सुरक्षा दलानं माओवादी समजून निष्पापांना झाडल्या गोळ्या; 8 वर्षांनंतर खुलासा
योगी सरकारचे मथुरेकडे लक्ष
योगी आदित्यनाथ यांनी सत्तेत आल्यानंतर 2017 साली मथुरेत नगरपालिकेची स्थापना केली. त्यानंतर नगरपालिकेच्या मार्फत या भागातील 7 स्थळांना तीर्थक्षेत्रांचा दर्जा दिला. आता या परिसरातील मद्यविक्री आणि मांसविक्री बंद करावी, अशी मागणी जोर धरत असल्यामुळेच हा फैसला केल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.