जाहिरात
मराठी बातम्या / देश / OMG! या व्यक्तिला झाला ब्रेस्ट कॅन्सर, डॉक्टरसह नातेवाईकही हैराण, पण...

OMG! या व्यक्तिला झाला ब्रेस्ट कॅन्सर, डॉक्टरसह नातेवाईकही हैराण, पण...

ब्रेस्ट कॅन्सर फोटो

ब्रेस्ट कॅन्सर फोटो

2022 च्या सुरुवातीला गाठीच्या तपासणीदरम्यान त्यांना स्तनाचा कर्करोग झाल्याचे समजले.

  • -MIN READ Local18 Patna,Bihar
  • Last Updated :

सच्चिदानंद, प्रतिनिधी पाटणा, 4 जून : कॅन्सरचे नाव ऐकताच कोणाचीही पायाखालची जमीन सरकते. पण असे अनेक लोक आहेत ज्यांनी या जीवघेण्या आजाराला तोंड देत त्यावर मात केली आहे. पाटणाच्या श्याम सुंदर केसरीचीही अशीच कहाणी आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या श्याम सुंदर यांना एके दिवशी कळलं की त्यांना ब्रेस्ट कॅन्सर आहे. हे ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मे 2022 मध्ये पहिल्यांदा हा आजार झाल्याचे त्यांना कळाले आणि वर्षाच्या अखेरीस श्याम सुंदर पूर्णपणे बरे झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून ते कामावरही जात आहेत. मात्र, या आजारामुळे त्यांच्या छातीचा काही भाग कापून काढण्यात आला.

News18लोकमत
News18लोकमत

याआधी दोनवेळा झाली शस्त्रक्रिया - श्याम सुंदर सांगतात की, 2022 च्या सुरुवातीला गाठीच्या तपासणीदरम्यान मला स्तनाचा कर्करोग झाल्याचे समजले. सुरुवातीला लक्षात नाही आले. स्त्रियांमध्ये असं होतं असं मी ऐकलं होतं, त्यानंतर पाटणा येथील मेदांता येथे उपचार सुरू झाले. दोनदा शस्त्रक्रिया झाली. यावेळी छातीच्या डाव्या बाजूचा भाग कापला गेला.

त्यानंतरही अनेक महिने उपचार सुरू होते आणि आता मी पूर्णपणे बरा आहे. तसेच 2023 पासून मी कामावर परतलो आहे आणि पूर्वीप्रमाणेच जोरदारपणे काम करत आहे, असे ते म्हणाले. या आजारपणात जेव्हा मला पैशांची गरज होती, तेव्हा माझ्या पगाराचा जो भाग मी गेली 36 वर्षे आरोग्य निधीच्या नावावर जमा करत होतो, तो माझ्या कामी आला. कॅन्सर तज्ज्ञ डॉ. संदीप कुमार यांच्या मते, स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये सर्वाधिक आढळतो, परंतु पुरुषांनाही होतो. पहिल्या किंवा दोन टप्प्यावर उपचार सुरू केले तर 90 टक्के रुग्ण वाचू शकतात. लोक अनेकदा स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे नंतर परिस्थिती अत्यंत धोकादायक बनते. म्हणूनच केवळ महिलांनीच नव्हे तर पुरुषांनीही वेळीच जागरूक होण्याची गरज आहे. जेणेकरून वेळेत उपचार करता येतील. डॉक्टर सांगतात की, जर तुम्हाला स्तनाच्या भागात कुठेही गाठ असल्यासारखे वाटत असेल ज्यामुळे वेदना होत नाही परंतु ती गाठ वाढतच राहिली तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: bihar , Local18 , patna
  • First Published :
जाहिरात
जाहिरात