स्वाती लाहोटा, दिल्ली, 11 एप्रिल : भाजपचा ४४ वा स्थापना दिवस आणि सनातनींचे श्रद्धास्थान असणाऱ्या हनुमानाची जयंती एकाच दिवशी आली हा एक फक्त योगायोग होता की संकेत? काही असेल पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण आणि त्यात हनुमानाच्या आयुष्यातून मिळणाऱ्या शिकवणींचा समावेश असणं हे खूपच सहज, स्वाभाविक होतं. हनुमानाची कार्यशैली आणि भाजपची काम करण्याची पद्धत यात समान शोधणं हे काही कठीण नव्हतं. हनुमानाचं आयुष्य संशोधनाचा विषय राहिला आहे. मॅनेजमेंट गुरु त्यांच्या लेक्चरमध्येही याबाबत संदर्भ देत आले आहेत आणि देत राहतील. याबाबत सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सुंदर कांडमधील राम काज किन्हे बिनु, मोहि कहाँ विश्राम! हनुमानाचे ब्रीदवाक्य आहे हनुमान सतत राम कार्यात विश्रांतीशिवाय कार्यरत आहे. रामकार्यासाठीच जन्म झालाय. अवतार, आतुरता, सर्व चेतनासुद्धा रामकार्य करण्यासाठीच आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, हनुमानाचे आयुष्य, त्याच्या आयुष्यातील प्रमुख प्रसंग आजही भारताच्या विकास यात्रेत प्रेरणा देतात. हनुमानाकडे खूप ताकद आहे पण या ताकदीचा वापर ते तेव्हाच करू शकतात जेव्हा त्यांचा स्वत:वरचा संशय संपतो. स्वातंत्र्याच्या आधी आणि विशेषत: २०१४ च्या आधी भारताची अशीच स्थिती होती. सामर्थ्य भरपूर पण देशातील नागरिक संभ्रमात होते. श्रीरामचरित मानसमधील एक प्रसंग आठवा. सीता हरण झाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी अनेक वानर-अस्वलांचे गट वेगवेगळ्या दिशांना पाठवण्यात आले. एका गटात जाम्बुवंत, हनुमान आणि किष्किंधाचा युवराज अंगद होता. हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर उदासपणे उभा होते. महासागर ओलांडायचा कसा अशा प्रश्न समोर असेल तर हतबल आणि नाराज होणं स्वाभाविक आहे. आयुष्यात आपणही आपल्याला अशा परिस्थितीत दिसतो. समोर ध्येय असतं पण रस्ता सापडत नाही. IPS Anurag Arya: UP मध्ये ज्यांनी माफियांची लावली वाट; कोण आहेत निडर, बेधडक IPS अनुराग आर्य हनुमानाला अभिशाप होता की जेव्हा त्याला त्याच्या संपूर्ण ताकदीची गरज असेल तेव्हा त्याच्या ताकदीचं भान राहणार नाही. २०१४ च्या आधी आपला भारत असाच नव्हता का? दहशतवादाला आसरा देणाऱ्या शक्ती जेव्हा पाहिजे तेव्हा देशाची सुख शांती लुटायचे आणि आपण सगळे मूकपणे पाहत होतो. सरकार दहशतवादावर कठोर शब्दा इशारा द्यायची आणि त्याबाबतची तीच तीच वक्तव्ये केली जायची इतकंच त्यांचं कर्तव्य असायचं. डॅमेज कंट्रोल करण्याची दुसरी पद्धतच नव्हती.
रामायणात हनुमानाला त्याच्या अमर्याद ताकदीची आठवण करून दिली जाम्बुवंतने. जाम्बुवंतने हनुमानाला निराशा त्याग करून शक्ती जागृत करण्यास आणि शक्यतांना ओळखण्यासाठी प्रेरित केलं. कहइ रीछपति सुनु हनुमाना. का चुप साधि रहेहु बलवाना. पवन तनय बल पवन समाना. बुधि बिबेक बिग्यान निधाना. कवन सो काज कठिन जग माहीं. जो नहिं होइ तात तुम्ह पाहीं. अर्थात पृथ्वीतलावर कोणतं असं कठीण काम आहे जे तुझ्याकडून होणार नाही. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार देशात येण्याआधी भारतात अशीच स्थिती होती. आज तोच भारत विश्वगुरु बनण्याचं स्वप्न पाहतोय आणि हे स्वप्न शेखचिल्लीच्या स्वप्नांसारखं नाही तर ही स्वप्ने साकार होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आपल्या देशावर झालेल्या दोन दहशतवादी हल्ल्यांची आणि त्यावर तत्कालीन सरकारकडून देण्यात आलेल्या प्रतिक्रियेची तुलना केली असता चित्र समोर येतं. पहिली घटना २००८ मध्ये मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला. मुंबईथ ताज हॉटेलवर हा हल्ला झाला होता. त्यानतंर २०१६ मध्ये जम्मू काश्मीरच्या उरी कँपमध्ये भारतीय लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयावर हल्ला झाला. जगाच्या 75 टक्के वाघ भारतात, मोदींकडून प्रोजेक्ट टायगरचं कौतुक 26/11 हल्ला मुंबईत झालेल्या हल्ल्यावेळी सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात तीन दिवस चकमक सुरू होती. स्वतंत्र भारताच्या इतिहासात हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यात १८ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १६६ जणांचा मृत्यू झाला तर ३०० हून अधिक जण जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी देशातील सर्वात सुरक्षित जागांपैकी एक असलेल्या ताज हॉटेलला टार्गेट करत सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढले. पाकिस्तानच्या कराचीतून १० दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत पोहोचले होते. मुंबईवरील हल्ल्याच्या तपासानंतर असं सिद्ध झालं होतं की पाकची गुप्तचर संस्था आयएसआयच्या अधिकाऱ्यांनी हा हल्ला करणाऱ्या लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्यांना मदत केली होती. अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी पोलिसांनी जिवंत पकडला होता. त्याला २०१२ मध्ये पुण्याच्या येरवडा जेलमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली. जगातील सर्वात मोठी लोकशाही, लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा सर्वात मोठा देश आणि त्यांच्या भूमीवर येऊन १० दहशतवादी मृत्यूचं तांडव घडवतात आणि आपण काहीच करू शकत नाही. आंतरराष्ट्रीय कूटनितीचा पहिला नियम आहे Offence is the best form defence. आक्रमण हीच स्वसुरक्षेची सर्वात चांगली पद्धत आहे. आपले राज्यकर्ते हा मूलभूत धडाच विसरले. गांधीजी म्हणायचे की जर कुणी तुमच्या गालावर एक थप्पड मारली तर दुसरा गालही त्याला थप्पड मारण्यासाठी पुढे करा. माफ करा बापू पण किमान या संदर्भात तरी तुम्ही योग्य नव्हता. असंच काहीसं द्रौपदी वस्त्रहरणावेळी भीष्म पीतामह यांच्यासह अनेक ज्येष्ठ शांत राहिले आणि मूकदर्शक बनले हे फक्त चुकीचंच नव्हे तर गुन्हा होता. बीग बी अमिताभ बच्चन यांचा सत्तरच्या दशकातला सुपर हिट चित्रपट आहे ‘मजबूर’. यात अमिताभ यांचा एक डायलॉग आहे. मी बंदूक पहिल्यांदा हातात घेतलीय पण ट्रिगर दाबला की गोळी सुटते हे माहितीय असं ते म्महणतात. मुद्दा असा की जर बंदूक हातात असेल तर बहुतांश वेळी ट्रिगर दाबण्याची गरजच नाही पडत. पण पाठीचा कणा नसल्यासारखं आपले राज्यकर्ते जगाला आमंत्रण द्यायचे की आमच्या अद्भुत भारतात या आणि काहीही करून जा. शपथ, आम्ही काहीच करणार नाही, खरंच. अद्भुतच होता असा देश जो आपल्या नागरिकांचा जीव गेल्यानंतर त्याचा बदला घेऊ शकत नव्हता. उरी हल्ला आता दुसऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेबद्दल. उरी हल्ला. १८ सप्टेंबर २०१६ ला पहाटे साडेपाच वाजता जैश ए मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या उरी कँपमध्ये असलेल्या भारतीय लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयावर हल्ला केला होता. या हल्ल्यात १९ जवान शहीद झाले आणि अनेक जवान जखमी झाले. दु:ख या गोष्टीचं आहे की जेव्हा हल्ला झाला तेव्हा सर्व जवान झोपले होते. दहशतवाद्यांनी ३ मिनिटात १७ हँड ग्रेनेड फेकले. त्यानतंर दहशतवाद्यांसोबत लष्कराची ६ तास चकमक सुरू होती आणि चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पण हे चार दहशतवादी फक्त प्यादे होते. रिमोट कंट्रोल सीमेपलिकडे होता. आता भारताची यानंतर रिएक्शन पाहा, यावेळी देशाचे पंतप्रधान मोदी आहेत. कोरोना काळात इतर देशांनाही लस पुरवतात आणि वसुधैव कुटुंबकमच्या मार्गाने चालतात. पण जेव्हा गोष्ट देशाच्या अस्मितेची असेल तेव्हा कठोर पावले उचलण्यास जराही कचरत नाहीत. युद्धपातळीवर गुप्त योजना आखली आणि फक्त दहा दिवसात भारताने पाकिस्तानला दाखवलं की भारतासोबत छेडछाड करून तुम्ही सहज वाचणार नाही. याची किंमत मोजावी लागेल. १५० कमांडोंच्या मदतीने सुनियोजित पद्धतीने सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला. ही पहिलीच वेळ होती जेव्हा दहशतवाद्यांविरुद्ध शत्रूच्या सीमेत घुसून लष्कराने एक ऑपरेशन केलं होतं. भारतीय लष्कराचे जवान पूर्ण प्लॅनसह २८-२९ सप्टेंबरच्या रात्री पाकव्याप्त काश्मीरच्या सीमेत ३ किमी आत घुसले आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. कारण Offence is the best form of defence. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या पावलामुळे ते कोट्यवधी भारतीयांचे आवडते बनले. देशात विश्वास निर्माण जाला की आपल्या देशाचं नेतृत्व आता एका सक्षम आणि समर्थ अशा नेत्याच्या हातात आहे आता कोणी बाहेरचा नजर वर करून पाहणार नाही. पहिल्यांदा वाटलं की आपल्या देशातही ताकद आहे आणि आपणही नुकसानीचा बदला घेऊ शकतो. जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या बुद्ध, महावीर आणि गांधींची ही जन्मभूमी, सुभाषचंद्र बोस, भगत सिंह यांच्यांरख्या योध्यांची सुद्धा जन्मभूमी आहे. जिथे शास्त्र अहिंसा परमो धर्म: अर्थात अहिंसाच परम धर्म आहे असं शिकवते तिथे शठे शाठ्यं समाचरेत् अर्थात वाईटासोबत कुधी, कुठे आणि कसं करायचं हे सर्व आम्ही ठरवू आणि ते करू जे योग्य वाटेल. फक्त इशारा देण्याचे दिवस गेले आता आपली कृतीच आपला इशारा आहे. नरेंद्र मोदींनी सत्य सांगितलं, आज भारत त्या हनुमाना सारखा आहे, त्या हनुमानाच्या महाशक्तीसारखा आपल्या आतील ताकदीचा अंदाज आला आहे. आज भारत समुद्रासारख्या मोठ्या आव्हानाचां सामना करण्यासाठी आधीपेक्षा जास्त सक्षम झाला आहे. मुंबई हल्ला आणि उरी हल्ला या दोन घटनांमध्ये कोणत्या भारताने चोख उत्तर दिलं हे तुम्हीच ठरवा. आपल्या देशाचं नेतृत्व एका भक्कम आणि सक्षम नेत्याकडे असावं या बाजूने आहात की लाचार राज्यकर्त्यांच्या? सक्षम भारत तुम्हाला भूरळ पाडतो की तुम्ही अहिंसेचं पालन नेभळट वाटेपर्यंत करणार आहात? उत्तर तुम्हाला आणि मलाही माहितीय. या देशाला हनुमानासारखा ताकदीचा अंदाज आला आहे. ताकद आणि उर्जेने भरलेला हा देश विश्वगुरू झाल्याशिवाय थांबणार नाही. Law Of Inertia ज्याला न्यूटनचा गतीचा पहिला नियम म्हटलं जातं त्यानुसार हे सत्य आहे. एक स्थिर वस्तू तोपर्यंत स्थिर राहते जोपर्यंत तिला गती देण्यासाठी बाहेरून ताकद लागत नाही आणि एक गतिमान वस्तू तोपर्यंत गतिमान राहते जोपर्यंत तिला रोखण्यासाठी बाहेरून ताकद लावली जाणार नाही. २०१४ नंतर भारत स्थिर नाही तर गतीमान देश बनलाय. प्रगतीपथावर अभिमानाने आणि बेधडकपणे पुढे जात आहे. आजच्या स्थितीत वाटत नाही की कोणती बाहेरची ताकद आपल्याला रोखण्याची हिंमत करेल. (स्वाती लाहोटी यांनी The Wind Beneath His Wings नावाचं पुस्तक लिहिलं आहे. अनेक पुस्तकांचा अनुवाद केला असून भारतीय इतिहास आणि समकालिन राजकीय मुद्द्यांवर त्यांनी लेखन केलंय.)