• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Assembly Election 2021: 'नेत्यांनी मला वेश्यासारखं सादर केलं', ट्रान्सजेंडर महिला अनन्याची निवडणुकीतून माघार

Assembly Election 2021: 'नेत्यांनी मला वेश्यासारखं सादर केलं', ट्रान्सजेंडर महिला अनन्याची निवडणुकीतून माघार

Assembly Election 2021: केरळ विधान निवडणुकीत (Kerala Assembly Elections) उमेदवार म्हणून मैदानात उतरलेली ट्रान्सजेंडर महिला अनन्या कुमारी अॅलेक्स (Ananya Kumari Alex) यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यावेळी त्यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

 • Share this:
  तिरुवनंतपुरम, 03 एप्रिल: केरळ विधान निवडणुकीत (Kerala Assembly Elections) उमेदवार म्हणून मैदानात उतरलेली ट्रान्सजेंडर महिला अनन्या कुमारी अॅलेक्स (Ananya Kumari Alex) यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यावेळी त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पक्षातील नेत्यांकडून आपल्याला मानसिक यातना दिली गेली, त्यामुळे आपण निवडणुकीतून माघार घेत (transgender woman Ananya withdraw her candidature) आहोत, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. 140 विधानसभेच्या जागा असणाऱ्या केरळमध्ये येत्या 6 एप्रिलला एकाच टप्प्यात निवडणूका पार पडणार आहेत. अनन्या कुमारी अ‍ॅलेक्स या केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील वेंगारा मतदारसंघातून डेमोक्रॅटिक सोशल जस्टिस पार्टीच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. पण डीएसजेपी नेत्यांनी आपला मानसिक छळ केला असा आरोप त्यांनी केला आहे. पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक प्रतिस्पर्धी आणि एलडीएफ सरकारविरूद्ध वक्तव्य करण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय पक्षाच्या नेत्यांनी आपला अपमान केला आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचा पक्ष इंडियन युनियन मुस्लिम लीगचे पीके कुन्हालीकुट्टी आणि डाव्या लोकशाही आघाडीचे नेते या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. अनन्या कुमारी अॅलेक्स यांनी पुढे सांगितलं की, प्रचारादरम्यान त्यांना जास्तीत जास्त पुढे येऊन प्रचार करण्यास सांगितलं होतं. तसेच अ‍ॅलेक्सचं म्हणणं आहे की, नेत्याच्या पक्षांनी त्यांना एक वेश्या म्हणून सादर केलं आहे. पक्षाच्या नेत्यांनी तिचा वापर केला, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. हे ही वाचा- आसाममध्ये मतदानानंतर भाजप उमेदवाराच्या कारमध्ये आढळलं EVM, 4 अधिकारी निलंबित जीवे मारण्याची दिली धमकी केरळमधील ट्रान्सजेंडर लोकांचं प्रतिनिधींत्व करण्यासाठी त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, असं अ‍ॅलेक्सचं  म्हणणं आहे. खरंतर माझंही एक वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. असं असताना माझ्यासोबत केल्या जाणाऱ्या अपमानजनक वागणुकीचा विरोध केला असता, पक्षाच्या नेत्यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर वेंगारा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने त्यांची निवड केली होता. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. अनन्या कुमारी अॅलेक्स या केरळमधील पहिल्या ट्रान्सजेंडर रेडिओ जॉकी आहेत.  त्याचबरोबर त्यांनी एक मेकअप आर्टिस्ट आणि न्यूज अँकर म्हणूनही काम केलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: