मराठी बातम्या /बातम्या /देश /

LCH : पहिले स्वदेशी हेलिकॉप्टर वायूसेनेत दाखल, 'या' वैशिष्ट्यांमुळे भरणार शत्रूला धडकी!

LCH : पहिले स्वदेशी हेलिकॉप्टर वायूसेनेत दाखल, 'या' वैशिष्ट्यांमुळे भरणार शत्रूला धडकी!

LCH : लष्करामध्ये आधी दाखल झालेली लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) आता हवाई दलातही अधिकृतरित्या दाखल झाली आहेत.

LCH : लष्करामध्ये आधी दाखल झालेली लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) आता हवाई दलातही अधिकृतरित्या दाखल झाली आहेत.

LCH : लष्करामध्ये आधी दाखल झालेली लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) आता हवाई दलातही अधिकृतरित्या दाखल झाली आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 3 ऑक्टोबर :  देशाला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे. लष्करामध्ये आधी दाखल झालेली लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) आता हवाई दलातही अधिकृतरित्या दाखल झाली आहेत. सैन्यदलाच्या एका कार्यक्रमात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते ही हेलिकॉप्टर्स आज (3 ऑक्टोबर 22) हवाईदलात समाविष्ट करण्यात आली. सीमेजवळील जोधपूरमध्ये ही हेलिकॉप्टर्स तैनात केली जाणार आहेत. ही हेलिकॉप्टर्स स्वदेशी बनावटीची आहेत, हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे. या एलसीएचची आणखी काय काय वैशिष्ट्यं आहेत, या विषयी ‘एबीपी लाईव्ह’नं सविस्तर वृत्त दिलं आहे.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या सरकारी कंपनीनं तयार केलेली लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर ही देशातील पहिली स्वदेशी बनावटीची अ‍ॅटॅक हेलिकॉप्टर्स आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षणविषयक कॅबिनेट समितीनं मार्च महिन्यात 15 स्वदेशी लाईट अटॅक हेलिकॉप्टरच्या खरेदीला मंजुरी दिली होती.

त्या पार्श्वभूमीवर एचएएलनं दोन लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर एलसीएच एव्हिएशनकडे सोपवल्याचं भारतीय सैन्य दलानं गुरुवारी सांगितलं होतं. ही सर्व 15 हेलिकॉप्टर्स 3387 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली आहेत. त्यापैकी 5 हेलिकॉप्टर्स लष्करासाठी व 10 हवाई दलांसाठी आहेत. लष्करामध्ये याआधीच हे हेलिकॉप्टर दाखल झालं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याआधी दहशतवादी हल्ला

एलसीएचची वैशिष्ट्य

- अमेरिकेकडून घेतलेल्या अपाचे हेलिकॉप्टरचं वजन 10 टन आहे, त्या तुलनेत एलसीएच हलकं असून, त्याचं वजन 6 टन आहे. यामुळे जास्त उंचीवरही क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्र घेऊन टेक ऑफ आणि लँडिंग करता येऊ शकतं.

- एलसीएचमध्ये 70mm चे 12-12 रॉकेटचे दोन पॉड बसवले आहेत.

- एलसीएचच्या पुढच्या भागात 20mmची बंदूक बसवण्यात आली आहे. ती 110 अंशात कोणत्याही दिशेनं फिरू शकते.

- फ्रान्समधून घेतलेलं ‘मिस्ट्रल’ एअर टू एअर म्हणजे हवेतून हवेत मारणारे क्षेपणास्त्र व हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र या हेलिकॉप्टरमध्ये बसवलं आहे.

- पायलटच्या हेल्मेटवरच कॉकपीटमधील सगळी फीचर्स डिस्प्ले होतील, अशा पद्धतीनं ते तयार केलं आहे.

- कारगिल युद्धानंतर अशा पद्धतीची स्वदेशी हेलिकॉप्टर तयार करण्याचा भारताचा मनसुबा होता. शत्रूचे 15-16 हजार फूट उंचीवरील बंकर उद्ध्वस्त करण्याची क्षमता असलेलं हेलिकॉप्टर त्यावेळी भारताकडे नव्हतं. 2006मध्येच या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती.

- 15 वर्षांच्या मेहनतीनंतर आता देशाला लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स मिळाली आहेत.

एलसीएचमध्ये असलेल्या स्टेल्थ फीचर्समुळे हे हेलिकॉप्टर शत्रूच्या रडारवर सहजासहजी दिसू शकत नाही. शत्रूच्या हेलिकॉप्टरनं एलसीएचवर क्षेपणास्त्र लॉक केलं, तरी त्याला चुकवण्याची क्षमता एलसीएचकडे आहे. या हेलिकॉप्टरचं बाहेरचं कवच चिलखती आहे. त्यामुळे गोळीबाराचा फारसा परिणाम होणार नाही. याच्या पंखांवरही गोळीबाराचा परिणाम होणार नाही.

'सरकार जाणीवपूर्वक अत्याचार करतंय, कारण..'; गंभीर आरोप करत माओवाद्यांचा PFI ला पाठिंबा

अपाचे व एलसीएचमध्ये काय फरक?

अपाचे अत्याधुनिक अ‍ॅटॅक हेलिकॉप्टर असलं तरी कारगिल आणि सियाचिनच्या उंच भागात त्याला टेक ऑफ व लँडिंगसाठी अडचणी आल्या आहेत. मात्र एलसीएचचं वजन कमी असल्यानं त्यात या समस्या येणार नाहीत.

सियाचिनमधील हिमनद्यांपासून ते राजस्थानातील वाळवंटापर्यंत अनेक ठिकाणी एलसीएच हेलिकॉप्टर्सच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यावेळी त्यावर शस्त्रास्त्र ठेवण्यात आली होती आणि पुरेसं इंधनही भरण्यात आलं होतं. हवाईदलात अधिकृतरित्या दाखल होण्याआधी ही हेलिकॉप्टर्स लडाखमधील नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात आली होती.

सप्टेंबर 2019मध्ये एबीपी न्यूजच्या टीमनं या हेलिकॉप्टर्सच्या वैशिष्ट्यांचा मागोवा घेतला होता. या मिशनसाठी टेस्ट पायलटला खास जबाबदारी देण्यात आली होती. हवेतून जमिनीवरील लक्ष्य भेदण्याची ही जबाबदारी होती. यासाठी हवेतच त्याची चाचणी घेण्याची आवश्यकता होती. त्यात हे हेलकॉप्टर यशस्वी झाले.

एलसीएच ही स्वदेशी बनावटीची खास हेलिकॉप्टर्स मिळाल्यामुळे आता हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे.

First published:

Tags: Helicopter, Indian army