LIVE NOW

LIVE: आचारसंहिता लागू; 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर

भारत बंद, कोरोनासह महाराष्ट्र आणि राज्यातील महत्त्वाच्या लेटेस्ट बातम्याचे अपडेट्स, वाचा इथे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे.

Lokmat.news18.com | February 26, 2021, 10:08 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated February 26, 2021
auto-refresh

Highlights

10:08 pm (IST)

अकोल्यातील प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊन 7 दिवसांनी वाढला, जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश, 1 मार्च ते 8 मार्चपर्यंत राहील लॉकडाऊन

10:08 pm (IST)

शनिवार आणि रविवारी लातूर जिल्ह्यात जनता कर्फ्यू, जिल्हाधिकाऱ्यांकडून जनतेला आवाहन, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन दिवस जनता कर्फ्यू, प्रशासन सक्ती करणार नाही मात्र सगळ्यांनी जनता कर्फ्यू पाळावा -जिल्हाधिकारी

9:26 pm (IST)

मराठा आरक्षण, कायदेशीर बाबींवर चर्चा होणार?
उद्धव ठाकरे, चव्हाण, फडणवीसांमध्ये चर्चा होणार?
येत्या रविवारी या नेत्यांची चर्चा होण्याची शक्यता
अशोक चव्हाणांची ठाकरे, फडणवीसांशी चर्चा -सूत्र
आरक्षणावर चर्चा करून कोर्टात भूमिका मांडणार
या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती

9:12 pm (IST)

10वी, 12वी परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर
10वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेदरम्यान
12वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मेदरम्यान
बोर्डानं विद्यार्थी-पालकांकडून मागवलेल्या सूचना-हरकती

8:36 pm (IST)

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा वाढता धोका
शनि. संध्या. 5 ते सोमवारी स. 9 पर्यंत संचारबंदी
जिल्हाधिकारी एम.देवेंद्रसिंह यांची घोषणा
संचारबंदीदरम्यान अत्यावश्यक सेवा राहणार सुरू

8:29 pm (IST)

जालना - लाचखोरांवर अँटी करप्शन ब्युरोची वक्रदृष्टी, अंबड येथील मंडल अधिकाऱ्याला 4 हजारांची लाच घेताना अटक तर लघुपाटबंधारे विभागाचा कनिष्ठ लिपिक 3 हजारांची लाच घेताना जेरबंद

8:04 pm (IST)

उद्या-परवा नागपुरात 2 दिवस बाजारपेठा बंद
अत्यावश्यक सेवाव्यतिरिक्त पूर्ण बाजारपेठा बंद
'नागरिकांवर या वीकेंड निर्बंधाची सक्ती नाही'
'माजी जबाबदारी म्हणून याचं पालन करावं'
'अशी प्रशासनाची नागपूरकरांकडून अपेक्षा'
पालकमंत्री नितीन राऊतांचीही जनतेला विनंती

7:57 pm (IST)

राज्यात दिवसभरात 8,333 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 4,936 रुग्ण बरे
राज्यात दिवसभरात 48 रुग्णांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 94.35 टक्के
राज्यात सध्या 67,608 ॲक्टिव्ह रुग्ण

7:44 pm (IST)

मराठी भाषेला लाभलेलं सांस्कृतिक वैभवाचं संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केले जातील -मुख्यमंत्री

7:42 pm (IST)

'मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणार'
प्रयत्नांची पराकाष्ठा करणार -उद्धव ठाकरे

Load More
जीएसटीच्या तरतुदीविरोधात उद्योजकांनी आज भारत बंद पुकारला आहे. भारत बंद, कोरोनासह महाराष्ट्र आणि राज्यातील महत्त्वाच्या लेटेस्ट बातम्याचे अपडेट्स, वाचा इथे.