अंजली सिंह राजपूत, प्रतिनिधी लखनऊ, 19 जुलै : जवळपास सर्वच मुली भातुकलीच्या खेळात आईच्या किंवा ताईच्या ओढणीची साडी नेसतात. तेव्हापासूनच त्यांच्यात छान तयार होण्याची हौस निर्माण होते. माझ्या लग्नात मी अशी नटेन, तशी नटेन, अशी अनेक स्वप्न प्रत्येक मुलीने पाहिलेली असतात. मग जेव्हा खरोखर लग्नाची वेळ येते, तेव्हा त्यावेळी कोणती ट्रेंडिंग फॅशन असेल, तसे कपडे, दागिने खरेदी करण्याकडे नवरीचा कल असतो. नवरीच्या चप्पलांकडेदेखील सर्व वऱ्हाड्यांच्या नजरा असतात. हीच बाब लक्षात घेऊन लखनऊच्या बाजारात नवरीसाठी चक्क चांदीची चप्पल आली आहे. तब्बल 25 हजार रुपयांची ही चप्पल आहे. सुंदर, नाजूक घुंगरांसह मोत्यांची डिझाईन असलेल्या या चप्पलांमध्ये 300 ग्रॅम चांदीचा वापर करण्यात आला आहे. या चप्पलेला मॅचिंग असा चांदीचा कंबरपट्टाही बनवण्यात आलाय. त्याची किंमत चप्पलेपेक्षा जरा कमी, तरीही खूप जास्त म्हणजे 20 हजार रुपये आहे. हा कंबरपट्टा इतर माणिक-मोत्यांच्या कंबरपट्ट्यांसारखा नाहीये, तर पॅण्टवर घातल्या जाणाऱ्या बेल्टसारखा आहे. जो नवरीला भरजरी लेहेंग्यावर सहजपणे वापरता येईल.
विनोद ज्वेलर्समधील विनोद माहेश्वरी यांनी सध्याचा ट्रेंड आणि फॅशन लक्षात घेऊन हा चांदीचा कंबरपट्टा आणि चांदीची चप्पल बाजारात आणली आहे. ते म्हणाले, दुकानात नवरी आणि तिचे नातेवाईक येऊन सतत चांदीच्या चप्पलांबाबत विचारायचे. त्यावरूनच मला ही कल्पना सुचली. दरम्यान, त्यांच्या दुकानात चांदीच्या पर्सदेखील उपलब्ध आहेत. जवळपास अर्धा किलो चांदीने त्या बनवण्यात आल्या आहेत. आपण कोणाच्या लग्नात जात असाल तर, आहेर म्हणून ही पर्स नवरीला देऊ शकता. त्यात काही वस्तूही ठेवता येतील. ‘दागिन्यांवर फक्त बायकोचा अधिकार, पती दावा करू शकत नाही’, न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय उत्तर प्रदेशच्या लखनऊ जिल्ह्यातील चौक भागात विनोद ज्वेलर्स आहे. इथून चांदीची चप्पल, चांदीची पर्स आणि चांदीचा कंबरपट्टा ऑर्डर करण्यासाठी आपण 9415008374 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.