याह्या सुलतान/कुलगाम/न्यूज18 उर्दू श्रीनगर 26 एप्रिल : एकीकडे आपल्या समाजात तेढ निर्माण करण्याचा काही समाजकंटक प्रयत्न करत असले तरी आजही अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लीम सलोखा (Hindu-Muslim Unity) जपला जात आहे. असंच एक उदाहरण काश्मीर खोऱ्यातून (Kashmir Valley) पुढं आलं आहे. काश्मीर खोऱ्याबद्दल तर अनेक गैरसमज पसरवले जातात. अशा पार्श्वभूमीवर ही घटना नक्कीच दखल घेण्यासारखी आहे. काश्मीर खोऱ्यातील सीमेलगतच्या लोलाब (Border Town LOlab) या शहरातमधील लालपुरा (Lalpura) भागात एक महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या अंत्यसंस्कारांत त्या परिसरात राहणारे मुस्लीम बांधवही सहभागी झाले होते. या बांधवांनी तिला शेवटपर्यंत साथ देत आपला शेजारधर्म निभावला. काश्मिरी पंडित असलेल्या रीटा कुमारी या 70 वर्षांच्या महिलेचा लालपुरा लोलाब इथं मृत्यू झाला. रिटाजींच्या निधनाची बातमी समजताच इथल्या मुस्लीम बांधवांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी लगेचच धाव घेतली (Muslim Participated In Hindu Woman’s Last Riots). या सगळ्यांसाठी त्या रिटा मावशी होत्या. बायकोच्या वाढदिवसानिमित्त अजान सुरू असताना वाजवला भोंगा, औरंगाबादेतील पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल 1990 च्या सुमारास जेव्हा अनेक पंडित काश्मीर खोरं सोडून निघून गेले, तेव्हा रिटा यांनी तिथंच राहण्याचं ठरवलं. आजूबाजूच्या संपूर्ण मुस्लीम समुदायासोबत त्या अखेरपर्यंत राहिल्या. त्यांच्या निधनामुळे आपल्या घरातीलच कुणीतरी गेल्याची भावना या मुस्लीम बांधवांच्या मनात आहे. हे सगळेजण त्यांच्या अंत्यसंस्कारांतही सहभागी झाले.
काश्मीर खोऱ्यात हिंदू-मुस्लूम किती एकोप्याने राहतात याची पुन्हा एकदा चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे. काश्मीरमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्य (Hindu- Muslim Unity In Kashmir) कायम असल्याचं रिटाजी यांच्या हिंदू नातेवाईकांचं म्हणणं आहे.
हिंदू आणि मुस्लीम संकटकाळात एकमेकांना कसे साथ देतात, एकमेकांच्या सुखदु:खात कसे सहभागी होतात हे सत्य ‘द कश्मीर फाईल्स’ या हिंदी चित्रपटाच्या (Kashmir Files) निर्मात्यांना दाखवणारी ही घटना असल्याचं रिटाजींच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. अभिमानास्पद! भारताने 18 वर्षांनंतर तोडला पाकिस्तानचा हा वर्ल्ड रेकॉर्ड; गिनीज बुकमध्ये नोंद आम्हाला ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट मान्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे द्वेषाच्या भिंती उभारण्यापेक्षा एकमेकांवर प्रेम करा असा संदेशही ते देतात. मात्र, प्रत्यक्षात फक्त द्वेष, तिरस्कार पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. काश्मीरमध्ये कायमच हिंदू-मुस्लीम ऐक्य नांदावं यासाठी आपण सतत प्रार्थना करत असल्याचंही ते म्हणाले. तर काश्मिरी हिंदूंच्या प्रत्येक दु:खात आम्ही सहभागी व्हायचो, ते दिवस आम्हाला आजही आठवतात असं मुस्लीम बांधवांनी सांगितलं. कितीही द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला गेला तरी धर्मापेक्षा माणुसकी श्रेष्ठ असं म्हणून सर्वधर्म समभाव हे आचरणात आणणं महत्त्वाचं. त्याचंच उदाहरण या नागरिकांना घालून दिलं आहे.

)







