Home /News /coronavirus-latest-news /

'राहुल गांधी अफवा पसरवतात' मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहानांचा पलटवार, मोदींवरील आरोपाला दिलं प्रत्युत्तर

'राहुल गांधी अफवा पसरवतात' मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहानांचा पलटवार, मोदींवरील आरोपाला दिलं प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींच्या ट्विटला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

    नवी दिल्ली, 27 जून : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे गैरसमज आणि अफवा पसरवण्याचं करत असून लसीकरणाबाबत (Vaccination) ते करत असलेल्या वक्तव्यं हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या जिवाशी खेळ असल्याची टीका मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी केली आहे. लसीकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्याला शिवराज सिंगांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “पहले हर देशवासी तर व्हॅक्सिन पहुंचा दो, फिर चाहे मन की बात भी सुना दो”, असं ट्विट करत राहुल गांधींनी देशातील संथ गतीनं सुरु असलेल्या लसीकरणावर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केलं होतं. काय म्हणाले शिवराज सिंग चौहान? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लसीकरण पुरवत आहेत आणि दुसरीकडं राहुल गांधी अफवा पसरवून देशातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींची आपल्याला लाज वाटत असल्याचं सांगत राहुल गांधींसारख्या नेत्यांमुळेच देशातील जनता लसीकरणाकडे पाठ फिरवत असल्याची टीका शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. हे वाचा - भारतातील कोरोनाची स्थिती, 'या' 10 राज्यांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध पंतप्रधानांचा ग्रामस्थांसोबत संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून बेतुल जिल्ह्यातील दुलारिया गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. या गावातील नागरिक काही गैरसमजांमुळे लसीकरण करून घेत नव्हते. त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमातून केला. आपल्या आईनंदेखील कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचं सांगत त्यांनी ग्रामस्थांच्या मनात लसींविषयी विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी ट्विट करून टीका केली होती. देशात लसी उपलब्ध करा आणि मग हवं ते बोला, अशा आशयाचं ट्विट केलं होतं. त्यावरून आता काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये ट्विटर-युद्ध रंगलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Mann ki baat, Rahul gandh, Shivraj singh chauhan

    पुढील बातम्या