पाटणा, 14 मे : लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) हे बिहारच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील (India Politics) प्रचलित नाव आहे. आता माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांच्याच परिवाराशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. लालू प्रसाद यादव यांच्या सून आणि तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांच्या पत्नी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांनी पुन्हा एका न्यायालयात धाव घेतली आहे.
23 जूनला पुढील सुनावणी -
पोटगीची रक्कम वाढून मिळावी, यासाठी त्यांनी पाटणा उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. 12 मे रोजी त्यांनी न्यायालयात धाव घेत हे अपील दाखल केले. न्यायमूर्ती आशुतोष कुमार यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आले आहे. याप्रकरणी न्यायालयाकडून तेज प्रताप यांना नोटीसही जारी करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी 23 जूनला होणार आहे.
न्यायालयाचा याआधीचा आदेशात काय म्हटलंय
तेज प्रताप यांच्या पत्नी ऐश्वर्या यांना प्रत्येक महिन्याला 23 हजार रुपये पोटगीच्या स्वरुपात देण्यात यावेत, असा आदेश न्यायालयाने दिला होता. आता ही रक्कम वाढवून देण्यात यावी, अशी मागणी ऐश्वर्या यांनी केली आहे. 12 मे 2018 रोजी लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव आणि ऐश्वर्या यांचे लग्न झाले होते. तर ऐश्वर्याने 12 मे 2022 रोजीच पोटगी वाढवण्यासाठी अपील दाखल केले आहे. म्हणजेच लग्नाच्या अवघ्या 4 वर्षानंतर ऐश्वर्या रायने पोटगी वाढवण्यासाठी अपील दाखल केले आहे.
हेही वाचा - मुस्लीम तरुणीला मंचावर बोलावण्यास मौलवींनी घेतला आक्षेप; त्यानंतर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, High Court, Patna