नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : राजद प्रमुख बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे सध्या किडनीच्या समस्येने त्रस्त आहेत. सध्या ते दिल्लीत असून लवकरच किडनी प्रत्यारोपणासाठी पुन्हा सिंगापूरला जाणार आहेत. लालू प्रसाद यादव यांची किडनी याच महिन्यात प्रत्यारोपण होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान ते किडणी प्रत्यारोपणासाठी तयार नव्हते परंतु त्यांच्या मुलगीच्या विनंतीवर त्यांनी किडणी प्रत्यारोपण करण्याचे ठरवले आहे. त्यांची मुलगी रोहिणी आपली किडनी लालू प्रसाद यांना देणार आहे. यामुळे मुलगी वडिलांच्या आजारपणाला धावून आल्याने लालुंच्या मुलगीची जोरदार चर्चा रंगली आहे.
मागच्या कित्येक महिन्यांपासून लालूप्रसाद यादव किडणीच्या आजाराने त्रस्त आहेत. ते दिल्लीती एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान ते किडनीच्या समस्येच्या उपचारासाठी सिंगापूरच्या प्रसिद्ध रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर सिंगापूरहून चेकअप करून परत आले.
हे ही वाचा : 'देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे, कारण...'; नितीन गडकरींकडून माजी पंतप्रधानांचं कौतुक
या दरम्यान त्यांची किडणी बदलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. यावेळी लालू प्रसाद यांची मुलगी रोहिणी लालूंसोबत होती. यावेळी तीची किडणी वडिलांनी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लालू आणि त्यांची मुलगी काही वेळापूर्वी सिंगापूरहून परल्यानंतर माहिती देण्यात आली आहे.
राजद नेते लालू प्रसाद यादव हे सध्या किडनीच्या समस्येने त्रस्त आहेत. सध्या ते दिल्लीत असून लवकरच किडनी प्रत्यारोपणासाठी पुन्हा सिंगापूरला जाणार आहेत. लालू प्रसाद यादव यांची किडनी याच महिन्यात प्रत्यारोपण होणार आहे. त्यांची मुलगी रोहिणी आपली किडनी लालूंना देण्याचे ठरले आहे.
सिगापुरात होणार पुढील उपचार
सध्या लालू प्रसाद यादव दिल्लीत आहेत. किडनीच्या समस्येमुळे लालूंनाही अनेक आजार झाले आहेत. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मिळालेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव यांचे किडनी प्रत्यारोपण लवकरच केले जाणार आहे. किडनी दाता त्यांचीच मुलगी रोहिणी आचार्य आहे. रोहिणी आचार्य या लालू आणि राबडीदेवी यांची दुसऱ्यानंबरची कन्या आहे.
हे ही वाचा : मुंबईत पुन्हा 26/11 सारख्या हल्ल्याची शक्यता, ड्रोनसह छोट्या विमानांतून दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत
मिळालेल्या माहितनुसार, लालू 20 नोव्हेंबरनंतर कधीही किडनी प्रत्यारोपणासाठी सिंगापूरला पोहोचू शकतात. लालू आपली मुलगी रोहिणीची किडनी घेण्यास तयार नव्हते असे सांगितले जात आहे. मात्र, रोहिणीने त्यांची खूप समजूत काढल्यानंतर त्यांनी होकार दिला. यासोबतच डॉक्टरांनी त्यांना कुटुंबातील सदस्यांनी दिलेले किडनी प्रत्यारोपण चांगले असल्याचा सल्लाही दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Kidney sell, Relief to lalu