जाहिरात
मराठी बातम्या / देश / चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना दिलासा; जामीन मंजूर

चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना दिलासा; जामीन मंजूर

चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना दिलासा; जामीन मंजूर

लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचा जामीन आज झारखंड उच्च न्यायालयानं मंजूर (High Court Grants Bail to Lalu Prasad Yadav) केला आहे. या निर्णयानंतर आता लालू यादव यांची तुरुंगातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

रांची 17 एप्रिल : चारा घोटाळा प्रकरणी एका वर्षाहून अधिक काळ तुरुंगात काढलेले राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचा जामीन आज झारखंड उच्च न्यायालयानं मंजूर (High Court Grants Bail to Lalu Prasad Yadav) केला आहे. या निर्णयानंतर आता लालू यादव यांची तुरुंगातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुमका कोषागारमधून अवैधरित्या 3.13 कोटी काढल्याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला आहे. या घोटाळ्यातल्या 4 प्रकरणांसंदर्भात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. यातील 3 प्रकरणांमध्ये त्यांना यापूर्वीच जामीन मिळालेला आहे. लालू यांचे वकील देवर्षि मंडल यांच्या म्हणण्यानुसार कोरोनाची स्थिती लक्षात घेता याप्रकरणी ऑनलाईन सुनावणी घेण्यात आली. झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अपरेश सिंह यांच्या खंडपीठानं दुमका कोषागार प्रकरणी सुनावणीनंतर आरजेडी नेते लालू प्रसाद यांना जामीन देण्याचा निर्णय घेतला. दुमका कोषागारमधून अवैधरित्या रक्कम काढल्याप्रकरणी याआधीदेखील अनेकदा सुनावणी झाली होती. मात्र, लालू यादव यांनी दिलासा मिळाला नव्हता. आपण अर्धी शिक्षा भोगली आहे, असं लालूप्रसाद यादव यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटलं होतं. याचिकेत त्यांनी असंही नमूद केलं होतं, की आपलं वय खूप आहे. त्याचबरोबर विविध गंभीर आजारानं आपण ग्रस्त आहोत, त्यामुळे जामीन दिला जावा. मागील काही दिवसांपासून असं वृत्त समोर येत होतं, की वडिलांच्या सुटकेसाठी त्यांची मुलगी रोहिनी आचार्य रोजा धरणार होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहिणीनं स्वतः याबाबतची माहिती दिली होती. इतकंच नाही तर यानंतर लालू यांचा मुलगा तेजप्रताप यादवनंदेखील नवरात्रीच्या मुहूर्तावर देवीची पुजा करणं सुरू केलं होतं. याशिवाय बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि लालू यांचा लहान मुलगा तेजस्वी यादवदेखील मंदिरात पोहोचले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात