मराठी बातम्या /बातम्या /देश /

WhatsApp ची मोठी कारवाई, 20 लाख युजर्सना केलं बॅन, तुम्ही ‘अशी’ चूक तर करत नाही ना?

WhatsApp ची मोठी कारवाई, 20 लाख युजर्सना केलं बॅन, तुम्ही ‘अशी’ चूक तर करत नाही ना?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामनं (Lakhs of accounts banned by twitter as per new IT rules) नव्या आयटी कायद्यानुसार लाखो युजर्सवर कारवाई केली आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामनं (Lakhs of accounts banned by twitter as per new IT rules) नव्या आयटी कायद्यानुसार लाखो युजर्सवर कारवाई केली आहे. व्हॉट्सअपने दिलेल्या माहितीनुसार 2021 या वर्षात आतापर्यंत 20 लाखांपेक्षा (More than 20 lakh WhatsApp accounts banned) अधिक अकाऊंट्स बॅन केली आहेत. तर व्हॉट्सअपची पॅरेंट कंपनी असणाऱ्या फेसबुकनं आतापर्यंत लाखो प्रकारचे कंटेट (Facebook removed objectionable content) आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहेत. आपल्या मासिक अहवालात व्हॉट्सअपने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात त्यांच्याकडे 420 तक्रारी दाखल झाल्या. त्यानंतर जवळपास 20 लाख 70 हजार खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

अशी झाली कारवाई

व्हॉट्सअपला 16 जून ते 31 जुलै या कालावधीत 594 तक्रारी मिळाल्या. त्यावरून एकूण 3,027,000 एवढ्या भारतीयांच्या खात्यावर कारवाई करण्यात आली आहे. पूर्ण जगभरात व्हॉट्सअपने एका महिन्यात जवळपास 80 लाख खाती बॅन केली आहेत. व्हॉट्सअपच्या END TO END ENCRYPTION पॉलिसीमुळे वापरकर्त्यांचे मेसेजेस कंपनी पाहू शकत नाही. त्यामुळे युजर्सच्या सुरक्षेचा विचार करून आणि तक्रारींचा नूर लक्षात घेऊन कारवाई केली जात असल्याची माहिती व्हॉट्सअपने दिली आहे. नव्या आयटी नियमांनुसार प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दरमहा कम्प्लायन्स रिपोर्ट देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

हे वाचा - TIT FOR TAT: यापुढे ब्रिटीश नागरिकांसाठी भारतात कडक कोरोना निर्बंध

या कारणांसाठी कारवाई

कम्प्लायन्स रिपोर्टनुसार 2.9 कोटी जणांवर स्पॅमसाठी, हिंसेला प्रवृत्त केल्याबद्दल 26 लाख, अश्लील कंटेंटबद्दल 20 लाख, हेट स्पीचसाठी 2 लाख 42 हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सामाजिक हिताला बाधा पोहोचवणारा तपशील तयार करणे आणि फॉरवर्ड करणे यासारख्या कारणांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करणाऱ्या प्रत्येकाविरोधात कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा सरकारनं दिला आहे.

First published:

Tags: Facebook, Instagram, Whats app news