• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Kulgam Encounter: दोन दहशतवाद्यांना घेरलं जवानांनी; एकाचा खात्मा तर दुसऱ्याचा शोध सुरु

Kulgam Encounter: दोन दहशतवाद्यांना घेरलं जवानांनी; एकाचा खात्मा तर दुसऱ्याचा शोध सुरु

Kulgam Encounter: या भागात काही दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती लष्कराला मिळाली होती.

 • Share this:
  श्रीनगर, 12 नोव्हेंबर: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये (Kulgam encounter) चकमक झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. कुलगाममधील छवालगाम (Chawalgam) गावात दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आलं असून त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भागात काही दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती लष्कराला मिळाली होती. या माहितीनंतर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आणि दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आलं. एक दहशतवादी ठार झाला असून एक अद्याप लपला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या बऱ्याच दिवसांपासून खोऱ्यात सुरक्षा दलांचं सर्च ऑपरेशन सुरु आहे. त्या ऑपरेशन अंतर्गत दहशतवादी तळांना लक्ष्य केलं जात असून प्रत्येक दहशतवाद्याला ठार केलं जात आहे. याच भागात गुरुवारी कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं. कुलगामच्या छवालगाम भागात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराने मिळून संपूर्ण परिसराला वेढा घातला असून आतापर्यंत चकमक सुरू आहे. हेही वाचा-  Corona लस नाहीतर ही गोळी ठरेल उपचारासाठी 'Game Changer' या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असून एक अजूनही लपून बसला आहे. सर्व दहशतवाद्यांचा वेळीच खात्मा व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय काल आणखी एका चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. बेमिना परिसरात ही चकमक झाली. खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये वाढ होत असताना लष्कराच्या कारवाईलाही वेग आला आहे. सामान्य नागरिकांना केलं जातंय लक्ष्य सध्या बऱ्याच काळानंतर दहशतवादी काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहेत. फक्त तारीख आणि ठिकाण वेगळे असले तरी अनेक निरपराध नागरिकांना दहशतवाद्यांकडून गोळ्या घातल्या जात आहेत. हेही वाचा-  चीनच्या अध्यक्षांच्या नावाचं स्पेलिंग Xi Jinping आहे, तरीही उच्चार शी जिनपिंग असा का?
   अनेक बाहेरील लोकांवरही हल्ले होत आहेत, त्यामुळे काही भागातून स्थलांतर सुरू झाले आहे. ही परिस्थिती पाहता खोऱ्यात लष्कर आणखी मजबूत करण्यात येत आहे. काही भागात सुरक्षा दलांची संख्याही वाढवण्यात येत आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: