Home /News /national /

आता श्रीलंकेतही भारतीय जनता पार्टी! जाणून घ्या काय आहे सत्य?

आता श्रीलंकेतही भारतीय जनता पार्टी! जाणून घ्या काय आहे सत्य?

राम माधव यांनी एका श्रीलंकेच्या न्यूज चॅनलचा स्क्रीन शॉट ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये दिसत असलेल्या नेत्याचा परिचय हा व्ही. मुत्थुस्वामी (V. Muththusami) नेते श्रीलंका भारतीय जनता पार्टी (Leader, Sri Lanka Bharatiya Janata Party) असा आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 7 मार्च :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं (BJP) गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्याचबरोबर मागील सात वर्षांमध्ये भाजपचा चांगलाच विस्तार झाला असून त्यांनी अनेक राज्यांमध्ये सत्ता मिळवली आहे. भारतीय जनता पक्षाचा हा विस्तार देशात तर झाला आहेच. त्याचबरोबर आता श्रीलंकेतही भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आहे. भाजप नेते राम माधव यांनीच याबाबत खुलासा केला आहे. राम माधव यांनी एका श्रीलंकेच्या न्यूज चॅनलचा स्क्रीन शॉट ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये दिसत असलेल्या नेत्याचा परिचय हा व्ही. मुत्थुस्वामी (V. Muththusami) नेते श्रीलंका भारतीय जनता पार्टी (Leader, Sri Lanka Bharatiya Janata Party) असा आहे. Sri Lanka Bharatiya Janata Party 😂 pic.twitter.com/3KrZZ1YMbc — Ram Madhav (@rammadhavbjp) March 7, 2021 राम माधव यांनी हे ट्विट करताच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याला कारणही तसंच आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव (Biplab Kumar Deb) यांनी मागच्या महिन्यात श्रीलंका आणि नेपाळमध्येही भारतीय जनता पार्टी सरकार बनवेल असा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटले होते. त्यानंतर श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानंही आमच्या घटनेनुसार कोणत्याही विदेशी पक्षाला देशात काम करण्यास परवानगी नसल्याचं स्पष्ट केले होते. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य ताजं असल्यानं आता राम माधव यांच्या ट्विमुळे श्रीलंकेतही भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्या न्यूज चॅनलचा स्क्रीन शॉट माधव यांनी शेअर केला आहे, त्या न्यूज चॅनलनंच मुत्थुस्वामी यांच्या हवाल्यानं याबाबतची नेमकी माहिती दिली आहे. ( वाचा : आम्हाला मत दिलं नाही तर वीज अन् पाणी पुरवठा खंडित करू, TMC नेत्याची धमकी ) 'श्रीलंकेतील भाजपचा भारतामधील भाजपशी काहीही संबंध नाही. भारतानं आमची मदत केली तर त्याची माहिती आम्ही मीडियाला देऊ. आमचा हेतू सरकारच्या मदतीनं देशातील शिक्षण आणि खेळाचा स्तर उंचावणे हा आहे.' असे श्रीलंकेच्या चॅनलनं स्पष्ट केले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BJP, Ram madhav, Sri lanka

    पुढील बातम्या