जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'या' कारणांमुळे लिंबाचे भाव भिडले गगनाला; वाचा, लिंबू स्वस्त कधी होणार?

'या' कारणांमुळे लिंबाचे भाव भिडले गगनाला; वाचा, लिंबू स्वस्त कधी होणार?

'या' कारणांमुळे लिंबाचे भाव भिडले गगनाला; वाचा, लिंबू स्वस्त कधी होणार?

आज लिंबाची (lemon) तुलना सोन्यासोबत केले जात आहे. हे खरंय. कारण लिंबाची भाव गगनाला भिडले आहेत. (lemon price increased) त्यामुळे भारतातील नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 एप्रिल : आज लिंबाची (lemon) तुलना सोन्यासोबत केले जात आहे. हे खरंय. कारण लिंबाची भाव गगनाला भिडले आहेत. (lemon price increased) त्यामुळे भारतातील नागरिकांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, एक लिंबू खरेदी करायला सरासरी 10 ते 15 रुपये खर्च करावे लागत आहेत. मात्र, लिंबाच्या भाववाढीचे कारण काय आहे? नेमके असं काय झालं की, लिंबाचे भाव इतके गगनाला भिडले? याबाबत शेतीपासून ट्रान्सपोर्ट आणि बाजारापासून ते तुमच्या लिंबू पोहोचण्यापर्यंत, नेमकी परिस्थिती काय आहे, वाचा हा स्पेशल रिपोर्ट. शेतीचे गणित - देशात जवळपास 3.17 लाख हेक्टरमध्ये लिंबाची शेती केली जाते. 45 हजार हेक्टर इतकी शेती आंध्रप्रदेशमध्ये केली जाते. यामुळे आंध्रपदेश देशातील सर्वात जास्त लिंबू उत्पादक राज्य आहे. बाकी, प्रमुख लिंबू उत्पादक राज्यांत महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. लिंबाच्या शेतीबाबत सांगायचे झाले तर वर्षात तीन वेळा एका झाडाला लिंबू येतात. त्यांना बहार असे म्हणतात. त्यात पुढीलप्रमाणे समावेश आहे…

  1. अंबे बहार : जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फुले येण्यास सुरुवात होते आणि लिंब एप्रिलमध्ये तयार होऊ लागतात.
  2. मृग : जून-जुलैमध्ये मृग वसंत ऋतुमध्ये फळबागा फुलतात आणि लिंबू ऑक्टोबरमध्ये तयार होते.
  3. हस्त : लिंबाचा हा हंगाम सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत असतो, त्याची काढणी मार्चनंतर केली जाते.

या तीन पिकांनंतर पूर्ण वर्षभर लिंबू बाजारात उपलब्ध असतो. इंडियन एक्स्प्रेसमधील एका अहवालात असे म्हटले आहे, बाजारातील लिंबू पिकात अंबे बहारचा वाटा जवळपास 60% आहे. 30% मृग बहारमधून आणि उर्वरित हस्त बहारमधून पुरवठा केला जातो. मात्र, यावेळी काय झाले? उन्हाळ्यात लिंबाची मागणी कमालीची असते. यासाठी शेतकरी कोल्ड स्टोअरमध्ये लिंबू ठेवतात. मात्र, यावेळी त्यांना दुहेरी फटका बसला. केवळ हस्त बहारच नाही तर आंबे बहारात शेतकऱ्यांचा तोटा झाला. मागच्या वर्षी देशात मान्सूनचे प्रमाण फार चांगले होते. मात्र, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यात लिंबाच्या बागा जास्त आर्द्रतेसाठी संवेदनशील असतात, त्यामुळे अतिवृष्टीमुळे लिंबू फुलू शकला नाही. या परिस्थितीमुळे उत्पन्न घटले. आंबे बहार पिकालाही अवकाळी पावसाचा फटका बसला. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून यावेळी तापमान वाढू लागल्याने लहान फळे गळून पडली. वाहतूकही झाली महाग - रशिया-यूक्रेनच्या युद्धामुळे यावेळी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे भावही गगनाला भिडले. 22 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या भावात 14 वेळा वाढ झाली. यामुळे वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. याचा परिणाम बाजारातील भाजीपाला आणि फळांवर झाल्याने त्यांच्याही भाव वाढला. शेतकऱ्यांपासून मंडईपर्यंत आणि नंतर तेथून बाजार आणि घरांपर्यंत सर्वत्र वाहतुकीचा खर्च वाढला आहे. हे ही वाचा- La Nina | यंदा मान्सून चांगला बरसणार, ‘हे’ आहे महत्वाचं कारण, IMD ने वर्तवला अंदाज बाजारात कमी सप्लाई - एकीकडे भाजीपाला विक्रेत्यांना मंडईत लिंबू महाग मिळत आहे. तर दुसरीकडे वाहतुकीचाही खर्च वाढला आहे. हैदराबाद मध्ये एका लिंबू विक्रेत्याने सांगितले की, तो आधी 700 रुपयांना निंबूचा स्टेक विकत घेत होता. मात्र, त्यासाठी त्याला आता तब्बल 3500 इतके रुपये मोजावे लागत आहेत. उन्हाळ्यात लिंबाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने त्या तुलनेत पुरवठ्यात झालेली घट हे त्याचे एक कारण आहे. देशातील अनेक भागात उष्णतेची लाट निर्माण झाल्यामुळेही त्यामुळे लिंबाच्या मागणीतही वाढ झाली आहे. नुकतेच अनेक मोठे सण साजरा करण्यात आले, यादरम्यान लिंबाची मागणी वाढली. हेदेखील लिंबाचे भाव वाढण्याचे एक कारण आहे. दर कधी कमी होणार? अलीकडच्या काळात लिंबाच्या दरात घट होण्याची फारशी आशा नाही, असा अंदाज बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, काही ठिकाणी अंबे बहार पीक अपेक्षित आहे, जेथे हवामानामुळे फुले पडली नाहीत. मात्र, देशभरातील लिंबाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हे पुरेसे नाही. सध्या लिंबाचे पीक येत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. येणारे पुढील पीक ऑक्टोबरनंतरच बाजारात येऊ शकेल. तरच आवक सुधारेल आणि लिंबाच्या दरात घसरण होईल, अशी अपेक्षा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात