Home /News /national /

शरयू नदीमध्ये स्नान करताना बायकोला केलं किस, जमावाची नवऱ्याला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

शरयू नदीमध्ये स्नान करताना बायकोला केलं किस, जमावाची नवऱ्याला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी नदीकाठी स्नान करत असताना, आपल्या बायकोला किस केलं (Man Kissed wife in Sharayu river) म्हणून एका व्यक्तीला आजूबाजूच्या लोकांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

    अयोध्या, 23 जून : हिंदू संस्कृतीमध्ये गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांना मानाचं स्थान आहे. या नद्यांमध्ये डुबकी घेऊन लोक देवाला जल अर्पण करतात. गंगा नदीत स्नान केल्यामुळे पापक्षालन होतं अशी हिंदूधर्मियांची दृढ श्रद्धा असते. शरयू (Sharayu River) हीदेखील गंगा नदीची एक उपनदी. भगवान श्रीरामाची जन्मभूमी असलेले अयोध्या (Ayodhya River) हे शहर शरयू नदीच्या किनारी वसले आहे. दरवर्षी हजारो भाविक अयोध्या शहरात असणाऱ्या मंदिरांना भेट देतात, तसंच शरयू नदीमध्ये स्नान करतात. सध्या राम की पौडी (Ram ki Paudi) येथे पाण्याचा स्तरही कमी असल्यामुळे अयोध्येतील तसेच देशभरातील भाविक या नदीमध्ये स्नान करण्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत. मात्र, हाच आनंद एका नवदाम्पत्याला चांगलाच महागात पडला. सार्वजनिक ठिकाणी नदीकाठी स्नान करत असताना, आपल्या बायकोला किस केलं (Man Kissed wife in Sharayu river) म्हणून एका व्यक्तीला आजूबाजूच्या लोकांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अश्लीलता सहन नाही करणार मिळालेल्या माहितीनुसार, या पती-पत्नीचं नुकतंच लग्न झालं आहे. त्यानंतर राम की पौडी येथे येऊन ते शरयू नदीमध्ये स्नान (Man kissing wife in Sharayu river) करत होते. यावेळी पतीने आपल्या पत्नीला किस केलं. त्यानंतर आजूबाजूला स्नान करत असलेल्या लोकांनी “अशा प्रकारची अश्लीलता अयोध्येत सहन केली जाणार नाही” म्हणत पतीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पुढे त्याला मारहाण (Man beaten for kissing his wife in Ayodhya) करत, या दोघांनाही लोकांनी तिथून हाकलून लावलं. या सगळ्या घटनेदरम्यान पत्नीने मध्ये पडत पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही पतीला मारहाण होत राहिली. या सर्व घटनेचा व्हिडिओ (Ayodhya river kissing video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एनडीटीव्हीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर याबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. ते दोघं नवरा बायको होते, मग त्यांचं काय चुकलं? असा प्रश्न काही नेटिझन्स उपस्थित करत आहेत. तर, लोकांनी जे केले ते बरोबरच होतं, धार्मिक स्थळी त्यात सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची अश्लीलता सहन केली जाऊ नये, अशा आशयाचेदेखील काही ट्विट्स पहायला मिळाले. अयोध्या पोलीस करणार तपास दरम्यान, अयोध्या पोलीस विभागाने (Ayodhya Police) या प्रकरणाची दखल घेतली आहे. “अयोध्या पोलीस स्टेशन कोतवालीचे मुख्य पोलीस निरीक्षक यांना या प्रकरणी तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत त्यांना निर्देश दिले गेले आहेत.” अशा आशयाचे ट्विट अयोध्या पोलिसांनी केले आहे.
    First published:

    Tags: Ayodhya, Ganga river

    पुढील बातम्या