मराठी बातम्या /बातम्या /देश /

Kisan Tractor Rally: 'लाठीकाठी बरोबर ठेवा’, शेतकरी नेत्याचा खळबळजनक VIDEO व्हायरल

Kisan Tractor Rally: 'लाठीकाठी बरोबर ठेवा’, शेतकरी नेत्याचा खळबळजनक VIDEO व्हायरल

Viral Video of Rakesh Tikait: दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅलीच्या यशासाठी शेतकऱ्यांचं अभिनंदन करणाऱ्या ट्वीट नंतर BKU नेते राकेश टिकैत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना लाठीकाठी बरोबर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

चंदीगड, 27 जानेवारी: प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2021) काल दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) हिंसक वळण मिळालं होतं. दिल्लीतील रस्ते ते अगदी लाल किल्ल्यापर्यंत अत्यंत गोंधळाचं वातावरण होतं. या दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भाकियू नेते (BKU Leader Rakesh Tikait) राकेश टिकैत शेतकऱ्यांना त्यांच्याबरोबर लाठीकाठी बरोबर बाळगण्यास सांगत आहेत. याशिवाय टिकैत हे देखील सांगत आहेत की शेतकऱ्यांकडून त्यांची जमीन हिसकावून घेतली जात आहे. सरकार ऐकत नाही आहे आता सर्व या आपल्या जमीन काही वाचत नाही.

काही शेतकरी नेत्यांनी दिल्लीमध्ये झालेल्या कालच्या हिंसाचाराला दुर्दैवी म्हटलं आहे. काहींचं असं म्हणणं आहे की काल जो काही प्रकार झाला, काही ठिकाणी पोलिसांवर हल्ला देखील झाला त्याकरता शेतकरी संघटना जबाबदार नाहीत. एवढच नव्हे ज्यांनी असे काही प्रकार केले ती माणसं शेतकरी संघटनांची नव्हती असाही ठाम दावा या शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. या दरम्यान टिकैत यांचा व्हायरल होणारा व्हिडीओ संभ्रमात टाकणारा आहे.

" isDesktop="true" id="516609" >

याआधी त्यांच्या एका ट्वीटमुळे अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. त्यांनी किसान ट्रॅक्टर रॅली यशस्वी झाल्याबद्दल शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं होतं. त्यांनी काल झालेल्या आंदोलनाला शांतीपूर्ण आणि यशस्वी ट्रॅक्टर परेड म्हटलं होतं. यामध्ये त्यांनी सरकारला काही सल्ला देखील दिला होता. त्यांचं हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर आता व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

मंगळवारी प्रजासत्ताक दिनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिल्लीतील रस्त्यांवर ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावेळी लाल किल्ल्यासह दिल्लीतील अनेक ठिकाणी आंदोनलाला हिंसक वळण मिळालं होतं. एकंदरित परिस्थिती पाहता गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या निवासस्थानी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. याशिवाय हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली होती.

टिकैत म्हणाले- आमची लोकं तोडफोड करत नाहीत

मंगळवारी झालेले आंदोलन ठीकच झाले अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली आहे. आमची माणसं तोडफोड करत नाहीत असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, 'आम्ही गेली 35 वर्ष आंदोलन करत आहोत. ही हिंसा कुणी केली याची चौकशी व्हायला हवी. आम्ही झेंडे घेवून गेलो होतो, लाठी घेऊन नाही. ज्यांनी पोलिसांवर हल्ले केले त्यांचे फुटेज आम्ही मागवत आहोत. अशा लोकांना आंदोलन सोडावे लागेल.' त्यांनी असे देखील म्हटले आहे की ज्या मार्गावरून जायचे त्यांनी निश्चित केले होते, त्या मार्गावरून त्यांना जाऊ दिले नव्हते.

First published:

Tags: Farmer protest, Protesting farmers