Farmers Protest : ट्रॅक्टर रॅलीत शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडले, पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर

Farmers Protest : ट्रॅक्टर रॅलीत शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडले, पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर रॅली (Tractor Rally) काढणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers Protest) पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 जानेवारी : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर रॅली (Tractor Rally) काढणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers Protest) पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला आहे. रॅलीदरम्यान शेतकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडल्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकरी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली आंदोलन करत आहेत, त्यावेळी संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर भागात अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.

सिंघू बॉर्डरवरून शेतकरी ट्रॅक्टर घेऊन या भागात आले होते. दुसरीकडे दिल्लीच्या स्वरूप नगरमध्ये शेतकऱ्यांवर फुलं उधळण्यात आली. गाझीपूर बॉर्डरवरून अप्सरा बॉर्डर-हापूर रोड-आयएमएस कॉलेज-लाल कौन-गाझीपूर मार्गे शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली निघाली.

Published by: Shreyas
First published: January 26, 2021, 11:33 AM IST
Tags:

ताज्या बातम्या