लहान मुलांसाठी लसीकरणाला परवानगी मिळाल्याची बातमी आली आणि लगोलग या राज्यात एक खास लहानांसाठी लसीकरण केंद्रही सुरू झालं.
देशात कोरोना व्हायसरपासून बचाव करण्यासाठी लोकांचं मोठ्आ प्रमाणात लसीकरण करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आता मध्यप्रदेशातील जबलपुरमध्ये लहान मुलांसाठी Kids Vaccination Center उघडण्यात येत आहे.
जबलपूरचे महापालिका आयुक्त संदीप जीआर यांनी याविषयी बोलताना सांगितलं की जेव्हा सरकार आम्हाला लहान मुलांना कोरोना लस देण्याचे आदेश देईल तेव्हा या कोरोना Vaccination सेंटरवरून लहान मुलांना लस देण्यात येईल.
या सेंटरमध्ये लहान मुलांसाठी आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यात पिण्याचं पाणी, उत्तम फर्निचर, लहान मुलांसाठी झोका आणि महिलांसाठी सॅनिटरी पॅडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळं आता हे लसीकरण सेंटर देशभरात चर्चेत आलं आहे.
Covaxin ची लस लहान मुलांना द्यायला नुकतीच DGIC ने परवानगी दिली. लवकरच लहान मुलांचं लसीकरण सुरू होईल.