रांची, 3 डिसेंबर: घरच्यांचं लक्ष नसताना (Kids consume poison) लहान मुलांनी विष घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लहान मुलं खेळता खेळता काय करतील, याचा (Kids ate pesticide) भरवसा नसतो. मोठ्यांचं लक्ष नसताना लहान मुलं असं काही करतात, जी गोष्ट अनेकदा धोकादायक असते. आपण काय करतो आहोत, याची जाणीव नसल्यामुळे मुलांना धोक्याची जाणीव होत नाही. त्यामुळेच जिवाला धोका असणाऱ्या वस्तू मुलांच्या हातात पडणार नाहीत, याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. ही काळजी घेतली नाही, तर काय होतं, याचं उदाहरण नुकतंच समोर आलं आहे.
खेळता खेळता खाल्लं विष
तीन लहान मुलांनी खेळता खेळता किटकनाशक घेतल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीला आली आहे. झारखंडमधील गुमला भागात एकाच कुटुंबातील तीन मुलं रोजच्याप्रमाणं एकमेकांशी खेळत होती. पाच वर्षांची स्नेहा कुमारी, तीन वर्षांचा अश्विन पुरा आणि चार वर्षांचा अमित मिंज हे तिघं नेहमीप्रमाणं घरात खेळत होते. खेळता खेळता ही मुलं घरातील आतल्या खोलीत गेली. या खोलीत किटकनाशकांची बाटली ठेवली होती. कुणाच्याही नकळत या मुलांनी ती बाटली घेतली आणि त्यातलं विष मुलांच्या पोटात गेलं.
हे वाचा - 2 हजार रुपयांसाठी तरुणाला गाडीखाली चिरडून ठार मारले, वर्ध्यातील संतापजनक घटना
मुलं पडली बेशुद्ध
विष पोटात गेल्यामुळे ही तिन्ही मुलं एकाच वेळी चक्कर येऊन पडली. ते पाहून घरच्यांना जबर धक्का बसला. त्यांच्या शेजारी पडलेली किटकनाशकांची बाटली पाहून नेमका काय प्रकार घडला असावा, याची कल्पना घरच्यांना आली. त्यांनी तातडीने तिघांनाही उचलून रुग्णालयात नेलं. स्थानिक रुग्णालयानं दोघांना दाखल करून घेतलं. मात्र चार वर्षांच्या स्नेहाची तब्येत फारच गंभीर असल्यामुळे तिला राजधानी रांचीला हलवण्याचा सल्ला दिला. तिघांवरही सध्या उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेमुळे घरच्यांना जबर धक्का बसला असून तिघेही लवकर बरे व्हावेत, यासाठी ते प्रार्थना करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.