नवी दिल्ली, 29 मार्च : कर्नाटक राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. बुधवारी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की राज्यातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 13 मे रोजी मतमोजणीत निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल.
मुख्य निवडणूक आयुक्तांनी असेही सांगितले की विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 13 एप्रिल रोजी जारी केली जाईल, नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल आहे, त्यानंतर 24 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. निवडणूक आयोगाच्या या घोषणेमुळे कर्नाटकात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
80+ वयोगटातील वृद्ध आणि दिव्यांग घरी बसून मतदान करू शकतील
यावेळी कर्नाटक निवडणुकीत निवडणूक आयोग वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी एक नवीन आणि विशेष सुविधा देणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत घरबसल्या मतदानाची सुविधा 80 वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध असेल.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीबद्दल बोलताना ते म्हणाले की 224 मतदारसंघ असलेल्या राज्यात 36 जागा अनुसूचित जाती आणि 15 अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. ते म्हणाले की, 5.21 कोटी मतदार असून त्यापैकी 2.59 महिला मतदार आहेत. त्याच वेळी, 16,976 मतदार 100 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, तर 9.17 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. याशिवाय 80 वर्षांवरील 12.15 लाख मतदार आहेत, तर 5.55 लाख दिव्यांग मतदार आहेत.
वाचा - राजाराम साखर कारखाना निवडणुकीआधीच सतेज पाटील गटाला मोठा धक्का; 29 उमेदवार अपात्र
निवडणूक आयुक्तांनी सांगितली वोट फ्रॉम होम प्रक्रिया
सीईसी राजीव कुमार म्हणाले, 'आमची टीम फॉर्म-12 डी घेऊन अशा मतदारांकडे जाईल. याबाबत गुप्तता पाळण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओग्राफी करण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी 'सक्षम' हे मोबाईल अॅप्लिकेशन सुरू करण्यात आले असून, त्यामध्ये ते लॉग इन करून मतदान करण्याची सुविधा निवडू शकतात, असे त्यांनी सांगितले.
कर्नाटकात प्रामुख्याने 3 पक्षांमध्येच लढत आहे. येथे भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. येथे भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे आणि काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे, तर जनता दल (धर्मनिरपेक्ष) ही राज्यातील तिसरी सर्वात मोठी राजकीय शक्ती आहे. मागच्या वेळी काँग्रेस आणि जनता दलाने मिळून सरकार स्थापन केलं होतं. जे नंतर भाजपने पाडलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.