Home /News /national /

रिसेप्शन ठरलं पण नवरदेवाला झाला कोरोना, म्हणून वधू पक्षाने जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही

रिसेप्शन ठरलं पण नवरदेवाला झाला कोरोना, म्हणून वधू पक्षाने जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही

नवरदेवाला कोरोनाव्हायरस (Coronavirus) झाल्याचा संशय आहे, त्याला वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं. मात्र तरीही वधू पक्षाने रिसेप्शन पार्टी (Reception Party) दिली.

    तिरुवनंतपुरम, 05 फ्रेब्रुवारी :  4 फेब्रुवारी, मुहूर्ताची वेळ झाली, लग्नघटिका जवळ आली. मात्र नवरदेव आला नाही, अन् लग्न झालं नाही. तरीही नवरदेवाशिवायच वधूपक्षानं रिसेप्शन पार्टी (Reception party) देऊन टाकली. केरळच्या (Kerla) एरुमापेट्टीमध्ये वधू-वराचं लग्न न होताच रिसेप्शन पार्टी साजरी झाली आहे. थ्रिसुरमधील (Thrissur) हा नवरदेव लग्नासाठी आठवडाभरापूर्वी चीनहून (China) केरळला परतला. कोरोनाव्हायरसचा प्रकोप असलेल्या चीनहून परतलेला हा नवरदेव लग्नाच्या हॉलऐवजी वैद्यकीय देखरेखीत आहे. त्याच्यामध्ये कोरोनाव्हायरसची (Coronavirus) काही लक्षणं दिसताहेत का हे तपासण्यासाठी वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं आहे. मात्र लग्नाचं आमंत्रण तर सर्वांना दिलं होतं, त्यामुळे नवरदेवाच्या अनुपस्थितीतच वधूपक्षाने रिसेप्शनचा सोहळा आटोपून घेतला. आमंत्रित केलेल्या दिवशी आलेल्या पाहुण्यांना लग्नाची मेजवानी देण्यात आली. वर-वधूचं साताजन्माचं नातं जुळण्याआधीच कोरोना मंगळ बनून आला आणि लग्न न करताच वराशिवाय आपल्याचं लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावण्याची वेळ या नववधूवर आली. काही दिवस या नवरदेवाला वैद्यकीय देखरेखीत ठेवलं जाणार आहे. कोरोनाची लागण झाल्याची संशय असलेल्या व्यक्तीला सार्वजनिक कार्यक्रमांना 28 दिवस जाण्यास मनाई आहे. कारण हा कोरोनाव्हायरसचा Incubation period (व्हायरसने शरीरात प्रवेश केल्यापासून लक्षणं दिसण्यापर्यंतचा कालावधी) आहे. त्यामुळे हा कालावधी म्हणजेच कोरोना मंगळाचा प्रभाव हटेपर्यंत तरी या दोघांचं लग्न लागणार नाही. त्यामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. भारतात केरळमध्येच कोरोनाव्हायरचे 3 रुग्ण आढळून आलेत. लागोपाठ रुग्ण आढळल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे भारतात आता कोरोनाव्हायरसाच रुग्ण सापडू नये, अशी आशा अधिकाऱ्यांना आहे. 190 नमुन तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी 100 नमुने नेगेटिव्ह आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 2,421 जणांना सध्या वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं आहे. तसंच कोरोनाव्हायरची लागण होऊ नये, यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ------------------------------- अन्य बातम्या ऐकावं ते नवल! रुग्णाचा दावा, व्हिस्की पिऊन झाला कोरोनामुक्त Google वर 'कोरोना' सर्चिंग... व्हायरससह बिअरही ट्रेंडिंग
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या