Home /News /videsh /

ऐकावं ते नवल! रुग्णाचा दावा, व्हिस्की पिऊन झाला कोरोनामुक्त

ऐकावं ते नवल! रुग्णाचा दावा, व्हिस्की पिऊन झाला कोरोनामुक्त

गरम व्हिस्की (whisky) आणि मध (Honey) पिऊन आपला कोरोनाव्हायरस (Coronavirus) बरा झाल्याचा दावा एका ब्रिटिश (British) नागरिकानं केला आहे.

    बीजिंग, 05 फेब्रुवारी  : चीनमधल्या (China) जीवघेण्या कोरोनाव्हायरसने (Coronavirus) आतापर्यंत 490 लोकांचा बळी घेतला आहे,तर कित्येक रुग्ण रुग्णालयात जीवनमृत्यूशी झुंज देत आहेत.कोरोनाव्हायरसशी लढा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाव्हायरसला मारक असं औषध मिळावं यासाठी शास्त्रज्ञांचं संशोधन सुरू आहे. अद्यापपर्यंत तरी कोरोनाव्हायरसवर उपचार करता येईल असं कोणतंही औषध सापडलं नाही. मात्र वुहानमधल्या (Wuhan) एका ब्रिटिश नागरिकाने आपण कोरोनाव्हायरसवर उपचार केल्याचा दावा केला आहे. कॉनर रीड (Connor Reed) असं या व्यक्तीचं नाव आहे. कॉनर हे ब्रिटिश (British) असून गेल्या 3 वर्षांपासून ते चीनमध्ये राहतात. वुहानमध्ये ते शिक्षक आहेत. आपल्याला कोरोनाव्हायरस झाला होतो तेव्हा आपण व्हिस्की (whisky) आणि मध (Honey) पिऊन स्वत:वर उपचार केले, असा दावा त्यांनी केला आहे. 'द सन'च्या (The Sun) रिपोर्टनुसार रीड यांना फ्लू आणि न्युमोनिया होता. कॉनर यांनी द सनला दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ते तपासणीसाठी गेले तेव्हा त्यांना खोकलाही येत होता. तब्बल 2 आठवडे ते रुग्णालयात होते, मात्र त्यांनी डॉक्टरांनी दिलेले अँटीबायोटिक्स (Antibiotics) घेतले नाहीत. श्वास घेता यावा यासाठी त्यांनी आपलं इनहेलर वापरलं आणि अँटिबायोटिक्स न घेता गरम व्हिस्की आणि मध घेतलं. चीनमध्ये रुग्णांची वाढती संख्या चीनमध्ये कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या 490 झाली आहे आणि 24,324 जणांना याची लागण झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 65 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हे सर्व हुबेई प्रांत आणि वुहानमधील आहेत. आयोगाने सांगितलं की, मंगळवारी 3,887 नवीन प्रकरणं समोर आलीत. 431 लोकांची प्रकृती गंभीर आहे. तर 262 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आयोनं सांगितलं की, 3,219 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत एकूण 892 जणांना डिस्जार्च देण्यात आला आहे. ------------------------------------------------------ अन्य बातम्या Google वर 'कोरोना' सर्चिंग... व्हायरससह बिअरही ट्रेंडिंग
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: China, Coronavirus, Virus

    पुढील बातम्या