तिरुअनंतपुरम 08 मे : एका ग्राहकाच्या जेवणाच्या पार्सलमध्ये सापाची कात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर केरळच्या तिरुअनंतपुरमच्या नेदुमनगड येथील एक हॉटेल अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तात्पुरतं बंद करण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी ५ मे रोजी एका महिलेने चंदमुक्कूच्या दुकानातून पराठा मागवला होता. यात सापाची कात आढळली (Snake Skin found in Parotta Ordered from Hotel). तिरुवनंतपुरम येथील अन्न सुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल कुमार यांनी सांगितलं की, घटनेची नोंद झाल्यानंतर हॉटेल तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे. दोन क्वार्टर दारू पिऊनही नशा चढेना; वैतागून थेट गृहमंत्र्यांकडेच केली तक्रार, अन् मग.. रिपोर्ट्सनुसार, प्रिया नावाच्या महिलेने आणि तिच्या मुलीने जेवणासाठी दोन पराठे विकत घेतले होते, त्यापैकी एक मुलीने खाल्ला आणि आईने दुसरा पराठा खाण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिला पार्सलवर सापाच्या कातीचा एक भाग सापडला. तिने पोलिसांना याची माहिती दिली आणि नंतर प्रकरण अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं. त्यांनी हॉटेलची पाहणी करून ते बंद करण्याचे आदेश दिले.
Hotel in Kerala's Thiruvananthapuram has been temporarily shut after a customer allegedly found a part of a snake skin packed into her food. The snake skin was found in the newspaper that was used to pack the parottas, following which the food safety officials were alerted.
— Tushar ॐ♫₹ (@Tushar_KN) May 6, 2022
🤢 pic.twitter.com/WZXi30fVzd
‘आम्ही हॉटेलची तात्काळ पाहणी केली. तिथे अतिशय खराब स्थितीत जेवण बनवलं जात होतं. स्वयंपाकघरात पुरेशी प्रकाश व्यवस्था नव्हती आणि बाहेर कचरा टाकलेला दिसला. यामुळे आउटलेट तात्काळ बंद करण्यात आलं आणि कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. आमच्या प्राथमिक निष्कर्षानुसार सापाची कात ही अन्न पॅक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेपरमध्ये होती. इथे वृत्तपत्राचा वापर अन्न पॅक करण्यासाठी केला जात होता’ अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी अर्शिता बशीर, , यांनी दिली. सुनेनं भांडण करू नये म्हणून सोपवलं तांत्रिकाच्या हातात! आयुष्यातले 79 दिवस घडला असा भयंकर प्रकार अलीकडेच, कासारगोड जिल्ह्यातील एका भोजनालयातील अन्नातून विषबाधा झाल्यामुळे एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आणि 40 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हॉटेलमधील तीन कर्मचाऱ्यांवर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 304 (निष्काळजीपणामुळे मृत्यू), 308 आणि 272 (भेसळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा वैद्यकीय अधिकारी (डीएमओ) डॉ एव्ही रामदास यांच्या मते, शिगेला नावाच्या जीवाणूमुळे अन्नातून या लोकांनी विषबाधा झाली होती.