मराठी बातम्या /बातम्या /देश /

काय सांगता! गाडीमध्ये इंधन कमी असेल तर भरावा लागणार दंड; काय आहे हा नियम?

काय सांगता! गाडीमध्ये इंधन कमी असेल तर भरावा लागणार दंड; काय आहे हा नियम?

खरं तर वाहनात पुरेसं इंधन नसताना गाडी चालवणं हा दंडनीय अपराध आहे. मात्र, केवळ प्रवासी वाहनांसाठी हा नियम लागू होतो

खरं तर वाहनात पुरेसं इंधन नसताना गाडी चालवणं हा दंडनीय अपराध आहे. मात्र, केवळ प्रवासी वाहनांसाठी हा नियम लागू होतो

खरं तर वाहनात पुरेसं इंधन नसताना गाडी चालवणं हा दंडनीय अपराध आहे. मात्र, केवळ प्रवासी वाहनांसाठी हा नियम लागू होतो

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Kerala, India

मुंबई 29 जुलै : वाहन चालवायचं म्हटलं की वाहतुकीच्या कित्येक नियमांचं पालन करावं लागतं. अन्यथा वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागतं. साधारणपणे ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीची कागदपत्रं किंवा वाहन विमा नसल्यास दंड आकारला जातो. तसंच, वेगाने वाहन चालवणं, नो एंट्रीमध्ये गाडी चालवत जाणं अशा विविध कारणांसाठीही दंड आकारण्यात येतो. मात्र, गाडीत इंधन कमी असल्यामुळे दंड आकारल्याचं तुम्ही कधी ऐकलंय? केरळमध्ये असा एक प्रकार (Kerala man fined for less fuel in bike) समोर आला आहे. या दंडाच्या पावतीचाफोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

काय आहे प्रकरण?

केरळमधील बासिल श्याम नावाची व्यक्ती 22 जुलै रोजी आपल्या रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बाईकवरून ऑफिसला चालली होती. या वेळी राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ट्रॅफिक पोलिसाने त्यांना अडवले, आणि 250 रुपये दंड भरण्यास सांगितला. राँग साईडने गाडी चालवणं चुकीचं असल्यामुळे श्याम यांनी हा दंड भरला. यानंतर दंडाची पावती घेऊन ते तिथून निघून गेले.

3,419 कोटी रुपये Electricity Bill पाहून बसला 'शॉक', हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची आली वेळ

ऑफिसमध्ये गेल्यानंतर श्याम यांनी जेव्हा ती पावती नीट वाचली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की गाडीत पेट्रोल कमी असल्याचं कारण देऊन दंड आकारला गेला आहे. यानंतर त्यांनी दंडाच्या पावतीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. काही तासांमध्येच हा फोटो भरपूर व्हायरल झाला.

गाडीमध्ये पेट्रोल कमी असणं खरंच चुकीचं?

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोक याबाबत चर्चा करत आहेत. गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल कमी असणं यासाठी दंड कसा आकारला जाऊ शकतो? असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत. मात्र खरोखरच असं  आहे का?

टेक ऑफआधीच मोठी दुर्घटना; इंडिगोच्या विमानाचं चाक चिखलात फसलं अन्..

दंड आकारला गेल्यानंतर काही दिवसांनी श्याम यांना परिवाहन विभागातील एका अधिकाऱ्याचा फोन आला. या वेळी या अधिकाऱ्याने प्रकरणाची माहिती घेतली. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पुरेशा इंधनाशिवाय गाडी चालवणं हा खरोखरच गुन्हा आहे. मात्र, हा नियम केवळ प्रवासी वाहनांवर लागू होतो. खासगी वाहनांसाठी असा कोणताही नियम नसल्याचं या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं.

काय आहे नियम?

खरं तर वाहनात पुरेसं इंधन नसताना गाडी चालवणं हा दंडनीय अपराध आहे. मात्र, केवळ प्रवासी वाहनांसाठी हा नियम लागू होतो. कारण, प्रवासी वाहनांमध्ये पुरेसं इंधन नसल्यास ते ऐनवेळी बंद पडून त्याचा प्रवाशांना त्रास होतो. या वेळी गाडीचा चालक किंवा मालकाकडून दंड वसूल केला जातो.

First published:

Tags: Traffic Rules, Viral post