Home /News /national /

कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांना 7 दिवसांची सुट्टी, ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय

कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांना 7 दिवसांची सुट्टी, ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय

कोरोना (Corona) झालेल्या रुग्णांना 7 दिवसांची (7 days) विशेष सुट्टी (Special Leave) देण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे.

    तिरुवनंतपुरम, 17 सप्टेंबर : कोरोना (Corona) झालेल्या रुग्णांना 7 दिवसांची (7 days) विशेष सुट्टी (Special Leave) देण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे. केरळमध्ये (Kerala) गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कोरोनाचा उद्रेक सुरू असून सर्व उपाय करूनही साथ नियंत्रणात येत नसल्याचं चित्र आहे. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे केरळमध्ये सापडत असून नव्याने सापडणाऱ्या दैनंदिन रुग्णांचा आकडादेखील कमी होत नसल्यामुळे राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना झाला. तर विशेष सुट्टी देण्याची तरतूद केली आहे. कोरोनाची परिस्थिती गंभीर गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाचा सामना करत असलेल्या केरळमध्ये अजूनही परिस्थिती गंभीर आहे. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 22,182 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, तर 178 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे. यासह केरळमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 44,46,228 वर पोहोचली आहे. तर मृत्यूंची संख्या 23,16 वर पोहोचली आहे. देशातील कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावी झालेले राज्य म्हणून केरळची ओळख बनली असून केंद्र सरकारनं मदतीसाठी वारंवार या राज्यात पथकं पाठवली आहेत. कर्मचाऱ्यांसाठी विशेष घोषणा राज्यातील कोरोनाच्या उद्रेकाचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना झाला, तर 7 दिवस सुट्टी देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. या काळात कोरोना रुग्णाला सक्तीनं विलगीकरणात राहावं लागणार आहे. अनेक कर्मचारी सुट्टी घ्यावी लागू नये, म्हणून कोरोनाची लक्षणं लपवून ठेवतात. सुट्टी घेतल्यावर पगार कपात होईल, अशीही भीती अनेकांना असते. मात्र अशा कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांमुळे इतरांना कोरोना होण्याचं प्रमाण वाढतं. त्यातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची कुठलंही लक्षणं नसतात, मात्र टेस्ट पॉझिटीव्ह आलेली असते. असे रुग्ण कोरोनाचे वाहक बनल्यामुळे रोगाचा फैलाव अधिक वेगाने होत असतो. हे वाचा - जबरी दरोड्यातील फरार आरोपी 41 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात; सापळा रचून केली अटक कर्मचाऱ्यांनी कोरोनाची कुठलीही लक्षणं दिसली, तरी तातडीने चाचणी करून घ्यावी आणि कोरोना आहे की नाही, याची खातरजमा करावी, यासाठी प्रोत्साहन म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना झाल्यावर फुल्ल पगारी सरकारी सुट्टी मिळणार असल्यामुळे कर्मचारी किमान हा आजार लपवून ठेवणार नाहीत आणि त्यामुळे तो पसरणार नाही, अशी राज्य सरकारला अपेक्षा आहे. याचा निर्णयाचा काय फायदा होतो, हे येत्या काही काळात समजू शकेल.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Corona vaccination, Coronavirus, Kerala

    पुढील बातम्या