Home /News /national /

VIDEO हिंसाचार पसरविणाऱ्या तुकडे तुकडे गँगला काँग्रेसची फूस, अमित शहांचा गंभीर आरोप

VIDEO हिंसाचार पसरविणाऱ्या तुकडे तुकडे गँगला काँग्रेसची फूस, अमित शहांचा गंभीर आरोप

अमित शहांच्या या आरोपांमुळे काँग्रेस आणि भाजपमधलं प्रचारयुद्ध आणखी भडकणार आहे. CAA आणि NRCला काँग्रेसने जोरदार विरोध केला होता.

    नवी दिल्ली 26 डिसेंबर : दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकांना वेळ असला तरी त्याच्या प्रचाराची सुरुवात झाली आहे. काँग्रेसने रामलीला मैदानावर रॅली घेऊन नरेंद्र मोदी यांच्याविरोधात रणशिंग फुंकलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेत काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज जाहीर सभा घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केलाय. CAA आणि NRC प्रकरणी काँग्रेसने लोकांची दिशाभूल केलीय. या प्रकरणी तुकडे-तुकडे गँग हिंसाचाराला कारणीभूत आहे असा आरोपही त्यांनी केलाय. अमित शहांच्या या आरोपांमुळे काँग्रेस आणि भाजपमधलं प्रचारयुद्ध आणखी भडकणार आहे. CAA आणि NRCला काँग्रेसने जोरदार विरोध केला होता. या प्रकरणी देशभरातल्या अनेक विद्यापीठांमध्ये तीव्र आंदोलनं झाली होती. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यात काही लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक पोलिसही जखमी झाले होते. तर बुधवारी  काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी (Adhir  Ranjan Chaudhari) हे आपल्या वक्तव्यांनी कायम वादात सापडतात. कधी पंतप्रधान मोदींवर दिलेल्या वक्तव्यांवरून तर कधी भाजपच्या महिला नेत्यांवर केलेल्या टीकेवरून. आपलं हिंदी तेवढं चांगलं नसल्यामुळे त्याचा गैरअर्थ काढला जातो असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. यावेळीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी वक्तव्य करून वादाची ठिणगी पाडलीय. NRC देशात लागू करण्याचा कुठलाही विचार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी दिल्लीतल्या भाषणात स्पष्ट केलं होतं. भीमा कोरेगाव प्रकरणाच्या तपासात पुणे पोलीस घेणार FBIची मदत त्यावरून चौधरी यांनी शहा आणि मोदीवर शेलक्या भाषेत टीका केलीय. चौधरी म्हणाले, NRCबद्दल कुठलीच चर्चा नाही असं मोदी म्हणाले. पण त्यांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवणार. कारण मोदी आणि शहा म्हणजे रामू-श्यामूची जोडी आहे. ते दोघही लोकांची दिशाभूल करण्याचे मास्टर असल्याने त्यांच्यावर विश्वास नाही अशी टीका त्यांनी केली होती. या आधी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी निर्बला असं म्हटलं होतं. त्यावरूनही वाद झाला होता. मोदी आणि शहा हेच खरे घुसखोर असून ते गुजरातमधून दिल्लीत आले आहेत. पहिले त्यांनाच त्यांच्या राज्यात परत पाठवलं पाहिजे अशी टीका त्यांनी केली. चौधरी यांच्या या टीकेवर भाजपचा भडका उडाला असून चौधरी यांच्यावर भाजपने पलटवार केला होता.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Amit Shah

    पुढील बातम्या