इडुक्की (केरळ) 30 मार्च : केरळ विधानसभा निवडणुकीचा (Kerala Assembly Elections 2021) प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. सर्वच राजकीय पक्ष सध्या प्रचारात जोर लावत आहेत. इडुक्कीमध्ये निवडणूक प्रचाराच्या दरम्यान माजी खासदार जॉयस जॉर्ज यांनी काँग्रसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे.
केरळमधील सत्तारुढ एलडीफ (LDF) आघाडीचे उमेदवार आणि मंत्री एमएम मणी यांच्या प्रचार सभेत राहुल गांधींवर टीका करताना जॉर्ज यांची जीभ घसरली. 'राहुल गांधींपासून मुलींनी सावध राहिलं पाहिजे. राहुल निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फक्त मुलींच्या कॉलेजमध्ये जातात. तिथे ते महिलांना स्नायू कसे वाकवायचे हे शिकवत आहेत. काँग्रेस नेता हे एक अविवाहित संकट आहे. राहुल हे मुलींना कसं वाकायचं हे शिकवत आहेत. पण कृपया मुलींनी त्यांच्यासमोर सरळ उभं राहावं. त्यांनी अजून लग्न केलेलं नाही.' अशी आक्षेपार्ह टीका जॉर्ज यांनी राहुल गांधींवर केली आहे.
केरळ विधानसभेतील विरोधी पक्ष नेते रमेश चेन्निथला यांनी जॉर्ज यांचे हे वक्तव्य महिला आणि राहुल गांधी यांच्या विरोधात असल्याची टीका केली आहे. जॉर्ज यांच्या विरोधात तक्रार केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
(हे वाचा : संतापलेल्या केंद्रीय मंत्र्याने लगावली एकाला थप्पड? दिलं असं स्पष्टीकरण)
राहुल गांधी यांनी मागच्या आठवड्यात कोचिन मधील एका महिला कॉलेजला भेट दिली होती. यावेळी त्यांनी मुलींना जपानी मार्शल आर्टचे प्रात्याक्षिक दाखवले होते. तसेच तामिळनाडूमधील दौऱ्यात देखील राहुल यांनी एका विद्यार्थीनीला पुशअप चॅलेंज दिले होते.
केरळमधील सर्व जागांसाठी 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने वायनाडचे खासदार असलेले राहुल गांधी सध्या केरळच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या वेळी ते वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना भेटत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election 2021, Congress, India, Kerala Election, Rahul gandhi, Social media viral