उद्या म्हणजेच मंगळवारी पहाटे सव्वाचार वाजता चमोलीमधील भगवान बदरीनाथचे दरवाजेही उघडण्यात येतील. कोरोनामुळे इथेदेखील भक्तांना येण्याची परवानगी नसेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारनं लागू केलेल्या नियमांनुसार, केदारनाथ आणि बदरीनाथचे दरवाजे उघडताना पुजारी, देवस्थान बोर्डाचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह केवळ २५ लोकांना उपस्थित राहायला परवानगी असेल. याआधी शुक्रवारी म्हणजेच १४ मे रोजी यमुनोत्री आणि शनिवारी पाच मे रोजी गंगोत्रीचे दरवाजे खुले करण्याच्या वेळीही हीच व्यवस्था लागू केली गेली होती. उत्तराखंडमधील चारधाम या नावानं प्रसिद्ध असलेल्या केदारनाथ, बदरीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे दरवर्षी सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर एप्रिल-मे महिन्यात भक्तांसाठी खोलले जातात. मात्र, यंदा यावरही कोरोनाचं संकट आहे. याच पार्श्वभूमीवर यंदा चारधाम यात्रा रद्द करण्यात आली आहे.#केदारनाथ मंदिराचे दरवाजे सकाळी 5 वाजता उघडण्यात आले. pic.twitter.com/RbPv10O2o5
— News18Lokmat (@News18lokmat) May 17, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Temple, Uttarakhand