Home /News /national /

...जेव्हा मॅगीमध्ये मसाल्याचे दोन पॅकेट्स मिळतात, KBC मध्ये 1 कोटी जिंकूनही हा आनंद लाखमोलाचा

...जेव्हा मॅगीमध्ये मसाल्याचे दोन पॅकेट्स मिळतात, KBC मध्ये 1 कोटी जिंकूनही हा आनंद लाखमोलाचा

मॅगीच्या पाकिटात 1 मसाल्याचं पाकीट असतं, परंतु जर दोन मसाल्याची पाकिटं मिळाली तर त्यामुळे लहान मुलांनाच नाही तर केबीसीमध्ये (KBC) 1 कोटी रुपये जिंकणाऱ्या आयपीएस ऑफिसरला देखील होतो. वाचा काय आहे या महिला ऑफिसरची गमतीशीर पोस्ट

    मुंबई, 20 नोव्हेंबर: मॅगी हा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांमध्ये लोकप्रिय पदार्थ आहे. दोन मिनिटांत तयार होत असल्यामुळे फास्ट फूड पदार्थांमध्ये मॅगीला विशेष स्थान आहे. यामध्ये सामान्यपणे मॅगीच्या पाकिटात 1 मसाल्याचं पाकीट असतं, परंतु जर दोन मसाल्याची पाकिटं मिळाली तर त्यामुळे लहान मुलांनाच नाही तर केबीसीमध्ये (KBC) 1 कोटी रुपये जिंकणाऱ्या आयपीएस ऑफिसरला देखील होतो. सोशल मीडियावर या महिला करोडपतीची पोस्ट व्हायरल होत आहे. कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमात आयपीएस ऑफिसर असलेल्या मोहिता शर्मा यांनी नुकतेच 1 कोटी रुपये जिंकले आहेत. त्यानंतर त्यांनी एक गमतीदार फोटो शेअर केला आहे. ट्विटरवर त्यांनी आपल्याला मॅगीमध्ये मसाल्याची 2 पाकिटं सापडल्याचं ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी फोटोला शानदार कॅप्शनदेखील दिलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, 'केबीसी जिंकल्यानंतर लगेच मॅगीच्या पाकिटात 2 मसाला पाकिटं, मी खूपच नशीबवान आहे. देव खूपच दयाळू आहे.' त्यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. काहीजणांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत तर काहीजणांनी मॅगी कशा पद्धतीने शरीरासाठी हानीकारक असतं हे सांगितलं आहे. तर अनेकांनी केबीसी जिंकल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांच्या या फोटोवर प्रतिक्रिया देताना एकाने मॅगी कशा पद्धतीने वाईट आहे हे सांगितलं तर त्याच्याऐवजी ड्रायफ्रूट खाण्याचा सल्ला त्यांना दिला. त्याने ट्विटमध्ये लिहिले, मॅडम हा पदार्थ शरीरासाठी खूप हानिकारक आहे. अशा पद्धतीचे पॅक पदार्थ खाल्ल्याने पार्किन्सनसारखा आजार होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हे न खाता ड्रायफ्रुट, फ्रुट किंवा ग्रीन टीचे सेवन करू शकता. अमिताभ केबीसीत विचारतात ‘क्या किजिएगा इतनी धनराशी का?’ हा फोटो टाकून ‘इतक्या मसाला पाकिटांचं काय करणार?’असं एकाने ट्विट करत विचारलं आहे. तर एकाने खरच मसाल्याची 2 पाकिटे मिळाल्याने तुम्ही नशीबवान आहात. खूप कमी जण अशाप्रकारे नशिबवान असतात असं म्हटलंय. दरम्यान, मोहिता शर्मा या 2017 च्या बॅचच्या आयपीएस ऑफिसर आहेत. आपल्या या यशामध्ये केबीसीचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितलं. या सीझनमध्ये 1 कोटी रुपये जिंकणाऱ्या त्या दुसऱ्या स्पर्धक ठरल्या आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Amitabh Bachchan

    पुढील बातम्या