Home /News /national /

दोन्ही गर्लफ्रेंडला बोलावलं समुद्रावर, अन् Love Triangle मध्ये Boyfriend च ठरला बळी

दोन्ही गर्लफ्रेंडला बोलावलं समुद्रावर, अन् Love Triangle मध्ये Boyfriend च ठरला बळी

लव्ह ट्रॅगलचं एक (Love Triangle) धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

    बंगळुरु, 03 फेब्रुवारी: कर्नाटकात (Karnataka) लव्ह ट्रॅगलचं एक (Love Triangle) धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका तरुणाने आपल्या दोन गर्लफ्रेंडना दक्षिण कन्नड (Dakshin Kannada) जिल्ह्यातील सोमेश्वरा बीचवर (Someshwara Beach) एकत्र भेटण्यासाठी बोलावलं होतं. मात्र त्यांच्यात वाद झाल्यानंतर एका गर्लफ्रेंडनं (Girlfriend) समुद्रात उडी मारली. यानंतर तिला वाचवण्यासाठी तरुणानंही पाण्यात उडी मारली. यादरम्यान त्याची गर्लफ्रेंड वाचली, पण तो वाचू शकला नाही. मृत्यू झालेल्या तरुणाचं वय 28 असून त्याचे नाव लॉयड डिसूजा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सोमेश्वरा बीचवर ही घटना घडली. मृत्युमुखी पडलेला तरुण लॉयड इलियारपाडावू येथील रहिवासी होता. एकाच वेळी दोन महिलांसोबत त्याचे अफेअर सुरू होतं. त्याने सोमेश्वर बीचवर अफेअरच्या चर्चेसाठी दोन्ही महिलांना एकत्र बोलावलं होतं. मात्र यादरम्यान त्याचा त्याच्या एका गर्लफ्रेंडसोबत वाद झाला. याचा राग आल्यानं गर्लफ्रेंडनं समुद्रात उडी मारली. त्यावेळी समुद्रातील लाटा खूप उंच आणि धोकादायक होत्या. अशा स्थितीत त्याने गर्लफ्रेंडला वाचवलं, पण तो स्वतःच बुडाला. प्रचारादरम्यान ढसाढसा रडल्या BJP आमदार, म्हणाल्या... तरुणाला समुद्रात बुडताना पाहून आजूबाजूच्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्याला समुद्रातून बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेले. पण त्याचा जीव वाचला नाही. लॉयड नावाचा हा तरुण अबुधाबीमध्ये काम करायचा. कोविड 19 महामारीच्या काळात तो आपल्या गावी आला होता. वर्षभरापासून तो येथे राहत होता. यादरम्यान दोन महिलांना सोशल मीडियावर भेटल्यानंतर त्याची त्यांच्याशी मैत्री झाली होती. त्याचवेळी दोन्ही महिलांसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. या घटनेची माहिती देताना मंगळुरू पोलीस आयुक्त म्हणाले की, तिघांमध्ये काही काळ प्रेमसंबंधावरून वाद झाला होता. अशा परिस्थितीत या तरुणाने प्रकरण शांत करण्याचा विचार केला. हा सर्व वाद त्याला कायमचा संपवायचा होता. यासाठी त्याने दोन्ही महिलांना बीचवर एकत्र बोलावलं होतं. यादरम्यान गर्लफ्रेंडला वाचवताना त्याचा मृत्यू झाला. महिलेची प्रकृती ठीक आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Boyfriend, Death, Girlfriend, Karnataka, Love, Love story, Person death, Relationship, Save relationship

    पुढील बातम्या