कुमारस्वामींनी बहुमत जिंकल, आता खऱ्या परिक्षेला सुरवात

कुमारस्वामींनी बहुमत जिंकल, आता खऱ्या परिक्षेला सुरवात

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव जिंकला.

  • Share this:

बंगळुरू,ता.25 मे : कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव जिंकला. कुमारस्वामींनी ठराव मांडून त्यावर भाषण करत पाठिंब्याचं आवाहन केल. तर भाजपचे येडियुरप्पा यांनी भाषण केल्यानंतर भाजपच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला.

संख्याबळ नसल्यानं भाजपनं हा निर्णय घेतला. त्यामुळं अध्यक्ष के.के. रमेशकुमार यांनी आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचं जाहीर केलं आणि काँग्रेस आणि जेडीएसच्या सदस्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

15 तारखेला निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे सर्व आमदार हॉटेलमध्येच वास्तव्याला होते. आता या सर्व आमदारांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

224 सदस्यांच्या कर्नाटक विधासभेत 222 जागांवर निवडणूक झाली. त्यात भाजपला 104, काँग्रेसला 78 तर जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या.

टांगती तलवार कायम

15 तारखेला निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस मिळून भाजपशी लढत होते. आता कुमारस्वामींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसमध्येच भांडणाचे संकेत आहेत. उपमुख्यमंत्रीपद न मिळाल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संकेटमोचक डी. शिवकुमार हे नाराज आहेत.

तर उपमुख्यमंत्रीपद मिळालेले परमेश्वर यांनी नमनालाच पुढे काय होणार याचे संकेत देत कुमारस्वामींचा ताण वाढवला आहे. कुमारस्वामी सरकारला पूर्ण पाच वर्ष पाठिंबा देण्याबाबत अजून निर्णय घेतलाला नाही असं परमेश्वर यांनी स्पष्ट केल्यानं कुमारस्वामींची पुढची वाटचाल काटेरी असेल असं स्पष्ट संकेत काँग्रेसने दिले आहेत.

First published: May 25, 2018, 5:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading