बंगळुरू 13 मे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळपासूनच सुरू झाली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकड्यांनुसार, बहुमताचा आकडा पार करत काँग्रेस अनेक जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे. 224 सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे. मात्र बेळगावात मराठी माणसांचा आवाज असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला घवघवीत यश मिळेल, असा अंदाज होता. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, हा अंदाज चुकीचा ठरताना दिसत आहे. Karnataka Election Results 2023 Live Updates : काँग्रेसने गाठला बहुमताचा आकडा, स्वबळावर सत्तेच्या दिशेनं बेळगाव ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर आघाडीवर तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे आर एम चौगुले 7000 मतांनी पिछाडीवर आहेत तर खानापूर मतदार संघात भाजपचे विठ्ठल हलगेकर हे 18755 मते घेत आघाडीवर तर विद्यमान आमदार अंजली निंबाळकर हे 12000 मतांनी मागे आहेत बेळगाव उत्तर मतदारसंघात भाजपचे रवी पाटील हे 12,630 मतं घेत आघाडीवर आहेत तर त्यांच्या विरोधात उभे असलेले काँग्रेसचे असिफ उर्फ राजू शेठ हे 11966 मते घेत पिछाडीवर आहेत. येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अमर येलोरकर यांना 1296 मते मिळाली आहेत बेळगाव दक्षिणमध्ये भाजपचे अभय पाटील आघाडीवर आहेत, तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुस्कर पिछाडीवर आहेत कर्नाटकात यंदा भाजपला २०१८ च्या तुलनेत यावेळी ३० जागांचा फटका बसला आहे. दरम्यान, भाजपने आतापासूनच हालचाली सुरू केल्या असून भाजप आणि जेडीएस संपर्कात असल्याची माहिती समोर येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.