नवी दिल्ली, 26 जुलै: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय मतभेदानंतर, अखेर कर्नाटकचे मुख्यमंत्री (Karnataka CM) बी एस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी राजीनामा (Resign) देणार असल्याची घोषणा केली आहे. आज सायंकाळी चार वाजता ते राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत. 26 जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर येडीयुरप्पा यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.
I have decided to resign. I will meet the Governor after lunch: Karnataka CM BS Yediyurappa at a programme to mark the celebration of 2 years of his govt pic.twitter.com/sOn0lXAfeD
— ANI (@ANI) July 26, 2021
गेल्या शुक्रवारी येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली होती. या बैठकीत येडियुरप्पा यांनी वयाचं कारण देत आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचा प्रस्ताव मांडल्याची (offered to resign) माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. पण येडियुरप्पा यांनी मांडलेला प्रस्ताव स्विकारायचा की नाही हे पक्षावर अवलंबून असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात आलं होतं. पण त्यानंतर आज त्यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.
कोण असेल नवा मुख्यमंत्री?
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत प्रल्हाद जोशी यांचं नाव चर्चेत आहे. जोशी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. तसंच उत्तर कर्नाटकचे खासदार देखील आहेत. जोशी यांच्यानंतर बीएल संतोष यांच्या नावाचाही जोर आहे. संतोष अनेक वर्षांपासून संघटन मंत्री म्हणून काम करत असून सध्या ते भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत. त्यांच्याकडे कुशल प्रशासक म्हणून पाहिलं जातं. त्याशिवाय उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, भाजप नेते मुर्गेश निराणी आणि वसवराज एतनाल यांची नावेही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आहेत. दरम्यान एक दोन दिवसात नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित केलं जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm, Karnataka, Karnataka government, Resignation, Resigns