मराठी बातम्या /बातम्या /देश /कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार: सूत्र

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार: सूत्र

Karnataka Chief Minister BS Yediyurappa offered to resign: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा  मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच्या बातमीनं जोर धरला आहे.

Karnataka Chief Minister BS Yediyurappa offered to resign: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच्या बातमीनं जोर धरला आहे.

Karnataka Chief Minister BS Yediyurappa offered to resign: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच्या बातमीनं जोर धरला आहे.

नवी दिल्ली, 17 जुलै: कर्नाटकचे मुख्यमंत्री (Karnataka Chief Minister) बी. एस. येडियुरप्पा ( BS Yediyurappa) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच्या बातमीनं जोर धरला आहे. शुक्रवारी येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली होती. या बैठकीत येडियुरप्पा यांनी वयाचं कारण देत या पदाचा राजीनामा देत असल्याचा प्रस्ताव मांडला, ( offered to resign) अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान येडियुरप्पा यांनी मांडलेला प्रस्ताव स्विकारायचा की नाही हे पक्षावर अवलंबून असल्याचंही सूत्रांचं म्हटलं आहे. दरम्यान राजीनामा देण्याचं वृत्त येडियुरप्पा यांनी फेटाळून लावलं आहे.

जर नेतृत्व बदलण्याचा विचार भाजपनं केला असेल तर 26 जुलैपूर्वी नवीन मुख्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. 26 जुलै रोजी येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन दोन वर्षे पूर्ण होतील. तथापि, अद्याप त्यांच्या नंतर मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होईल याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. येडियुरप्पा यांनी शनिवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांची भेट घेतली.

दरम्यान सकाळी दिल्लीत येडियुरप्पा यांना हे पद सोडण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, प्रश्न उद्भवत नाही. आज येडियुरप्पा यांनी जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्याकडेही येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली.

दुहेरी हत्याकांडानं हादरलं पुणे; हॉटेल मालकानं केलेल्या हत्येनं खळबळ

त्यामुळे लवकरच कर्नाटकाच्या पुढच्या मुख्यमंत्र्याबाबत पक्ष लवकरच निर्णय घेईल, असं आश्वासन नड्डा यांनी येडियुरप्पा यांना दिलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. लवकरच कर्नाटकातील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात येईल आणि तोपर्यंत येडियुरप्पा हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे.

कोण असेल नवा मुख्यमंत्री?

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत प्रल्हाद जोशी यांचं नाव चर्चेत आहे. जोशी हे मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. तसंच उत्तर कर्नाटकचे खासदार देखील आहेत. जोशी यांच्यानंतर बीएल संतोष यांच्या नावाचाही जोर आहे. संतोष अनेक वर्षांपासून संघटन मंत्री म्हणून काम करत असून सध्या ते भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत. त्यांच्याकडे कुशल प्रशासक म्हणून पाहिलं जातं. त्याशिवाय उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, भाजप नेते मुर्गेश निराणी आणि वसवराज एतनाल यांची नावेही मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आहेत. दरम्यान एक दोन दिवसात नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित केलं जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

First published:

Tags: Karnataka, Karnataka government, Yediyurppa