S M L

'कागदाशिवाय 15 मिनिटं भाषण करून दाखवावं', मोदींचं राहुल गांधींना चॅलेंज

कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचार सभेचा आज प्रारंभ झाला आहे. मोदींनी आपल्या कर्नाटकच्या सभेत राहुल गांधींची जोरदार फिरकी घेतली.

Renuka Dhaybar | Updated On: May 1, 2018 02:00 PM IST

'कागदाशिवाय 15 मिनिटं भाषण करून दाखवावं', मोदींचं राहुल गांधींना चॅलेंज

01 मे : सध्या सर्वत्र कर्नाटक निवडणूकांचे वारे वाहताना दिसतायत. त्यात आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्नाटक दौऱ्यावर आहेत. कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचार सभेचा आज प्रारंभ झाला आहे. कर्नाटकच्या चामराजनगरहून प्रचाराला सुरूवात झाली आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुरप्पाच आहेत, अशी घोषणाही मोदींनी केली.

दरम्यान, मोदींनी आपल्या कर्नाटकच्या सभेत राहुल गांधींची जोरदार फिरकी घेतली. राहुल माझ्यावर खूप टीका करतात पण त्यांनी विश्वेश्वर्या हे नाव आधी नीट म्हणून दाखवावं. अशी कोटी मोदी यांनी केली आहे. राहुल गांधीने 15 मिनिटं विना कागद भाषण करून दाखवावं असं चॅलेंजही नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांना विश्वेश्वर्या म्हणता येत नाही, असा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्याच्यावर निशाना साधत मोदींनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

- कर्नाटकात भाजपचीच लाट येणार

Loading...
Loading...

- कर्नाटकात बदलाचे वारे वाहत आहेत याची वार्ता दिल्लीपर्यंत पोहोचली आहे

- 'मी' कर्नाटकच्या भावी मुख्यमंत्र्यासोबत बसलो आहे.

- भाजप कर्नाटकमध्ये नक्की जिंकणार ही लाट नाही हे वादळ आहे

- काँग्रेसचे अध्यक्ष कधी कधी मर्यादा सोडून बोलतात पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल गांधींवर कडाडून टीका

- कर्नाटकात भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून येडियुरप्पा यांचं नाव जाहीर

- देशाची दिशाभूल का करता मोदींचा काँग्रेसला सवाल

- काँग्रेसनं जनतेला खोटी आश्वासनं दिली

- भारतीय जनता पक्षाला सामान्य जनतेसाठी भल्याच्या आणि विकासाच्या मार्गावर चालायचं आहे. हा विश्वास मी तुम्हाला देतो.

- कर्नाटकात कोणतीही कायदा व सुव्यवस्था नाही. येथे लोकायुक्त सुरक्षित नाही तर सामान्य माणूस काय सुरक्षित राहील ?

- जर मुख्यमंत्र्यांना 2 1 फॉर्म्युला आहे तर मंत्र्यांचा 1 1 फॉर्म्युला असावा. पण सध्या मंत्र्यांचे नातेवाईक निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा अपमान आहे. हे काँग्रेसचे राजकारण आहे.

- चामराजनगरमध्ये पाण्याच्या आणि नोकरीच्या समस्या का आहेत. इथे पर्यटनाचे बार वाजले आहेत. राज्य सरकार काय करत आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2018 01:57 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close