धारवाड, 26 जुलै: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक छोटे उद्योगधंदे बंद पडले तर काही कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्यात आली. याच दरम्यान नोकरी गेल्याच्या विवंचनेतून दाम्पत्यानं आपल्या मुलीसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कोरोनामुळे नोकरी गेली तर जगायचं कसं आणि दुसरी मिळणार कशी या भीतीपोटी एकाच कुटुंबातील तीन जणांनी आपलं आयुष्य संपवलं आहे.
कर्नाटकातील धारवड इथे तरुण त्याची पत्नी आणि मुलगी अशा तिघांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी घटनास्थळावर पोलिसांना एका सुसाईड नोट मिळाली आहे. दरम्यान तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
Three members of a family (couple & daughter) died by suicide in Dharwad yesterday, allegedly over fear of job loss due to #COVID19. A suicide note found near bodies. Case registered, investigation underway: Inspector, Suburban Police Station Dharwad #Karnataka
— ANI (@ANI) July 26, 2020
हे वाचा-'गँग ऑफ वासेपूर' स्टाइल कैद्यांनी ठोकली धूम, जळगाव कारागृहातील घटनेचा VIDEO
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य लॉकडाऊन आणि कोरोनामुळे नोकरी गमावण्याच्या भीतीमुळे अस्वस्थ होते. त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचललं आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात अनेक कामं बंद असल्यानं मजुरांची परवड झाली. आर्थिक चणचण आणि मोठा फटका सगळ्याच क्षेत्रांना बसल्यानं कर्मचारी कपातीचं मोठं संकटही आलं. त्यामुळे अनेकांनी रोजगार गमवले तर काही गमवण्याच्या भीतीत आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकटांचा सामना करताना नोकरी जाण्याच्या भीतीनं दाम्पत्यानं आपल्या मुलीला संपवलं आणि नंतर आत्महत्या केली.
या प्रकऱणी पोलिसांना केवळ सुसाईट नोट मिळाली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.