जाहिरात
मराठी बातम्या / देश / India@75: शत्रुंच्या बंकरमध्ये घुसताच गोळ्या संपल्या; मग काय खंजीर उपसला अन्.. 25 वर्षीय जवानाचा 'महापराक्रम'

India@75: शत्रुंच्या बंकरमध्ये घुसताच गोळ्या संपल्या; मग काय खंजीर उपसला अन्.. 25 वर्षीय जवानाचा 'महापराक्रम'

India@75: शत्रुंच्या बंकरमध्ये घुसताच गोळ्या संपल्या; मग काय खंजीर उपसला अन्.. 25 वर्षीय जवानाचा 'महापराक्रम'

Kahta Hai Kargil: राजपुताना रायफल्सचे कॅप्टन निकझुको केनगुरुसी यांच्याकडे सोपवलेले मिशन म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्यासारखे होते. ते मिशन पूर्ण करण्याचा प्रयत्न आत्महत्येपेक्षा कमी नव्हता. असे असूनही, कॅप्टन केनगुरुसी शत्रूचा अंत करण्यासाठी या मोहिमेवर निघतो आणि नंतर…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 जुलै : यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या 75 वर्षात देशाला मोठं करण्यात अनेकांनी आपलं आयुष्य वेचलं आहे. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या कित्येक जवानांनी प्राणाची आहुती दिली आहे. अशाच काही देशनायकांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मी कारगिल… 1999 चा हिवाळा माझ्यासाठी आधीच्या हिवाळ्यापेक्षा वेगळा होता. सीमेपलीकडून अनोळखी चेहरे येत होते. या चेहऱ्यांच्या हातात मोठमोठी आधुनिक शस्त्रे आणि खांद्यावर जड वजनाच्या पिशव्या बांधलेल्या होत्या. हे भयानक दिसणारे अनोळखी चेहरे माझ्या सगळ्या शिखरांवर राहण्यासाठी अवघड व्यवस्था करत होते. त्यांच्या या बंदोबस्तात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून मोर्टार आणि रॉकेट लाँचर यांसारखी शस्त्रे आजूबाजूला पेरुन ठेवली होती. मला समजेना की सीमेपलीकडून आलेले हे भयानक चेहरे कोण आहेत? माझ्या या प्रश्नाचं उत्तर ‘ऑपरेशन विजय’मध्ये लपलं होतं. मला अजूनही 3 मे 1999 ची ती तारीख आठवते, जेव्हा पहिल्यांदाच माझ्या भारतीय सैन्यातील शूरवीरांची नजर या भयानक चेहऱ्यांवर पडली. त्यानंतर सुरू झाले कारगिल युद्ध आणि भारतीय लष्कराच्या शूरवीरांचे ‘ऑपरेशन विजय’. ऑपरेशन विजय दरम्यान मला समजले की हे सर्व भयानक, अज्ञात चेहरे भारताचे शत्रू आणि पाकिस्तानी लष्कर-निमलष्करी दलातील लोक आहेत, जे माझ्या मातीवर दुर्दैवाने माझ्या शिखरावर पोहोचले आहे. भारतीय लष्कराच्या शूर जवानांना सलाम. ज्यांनी ह्या लोकांना वेळेत त्यांची जागा दाखवली. त्याला मायभूमीवरुन पिटाळून लावले. कारगिलची ही लढाई द्रास सेक्टरमध्ये लढली गेली. शरीराची चाळण झालेली असतानाही शेवटच्या श्वासापर्यंत युद्ध द्रास सेक्टरमध्ये लढलेली ही लढाई आणि कॅप्टन नीकझुको केंगुरुसी यांचे हौतात्म्य माझ्या छातीत अजूनही धडधडत आहे. खरंतर, पाकिस्तानच्या शत्रूंनी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या द्रास सेक्टरच्या उंच बर्फाच्छादित टेकड्यांचा ताबा घेतला होता. परिस्थिती अशी बनली होती की द्रास सेक्टरच्या या टेकड्यांवरून पाकिस्तानी सैनिक नॅशनल हायवे वन अल्फावर लक्ष ठेवू शकत होते. शिवाय या महामार्गावरून जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्यालाही सहज लक्ष्य करू शकत होते. अशा परिस्थितीत द्रास सेक्टरवर कुंडली मारुन बसलेल्या पाकिस्तांनी सैन्याला तिथून पिटाळून लावणं हे मोठं टास्क होतं. भारतीयांच्या ताब्यात ते खोरं येणं सर्वच दृष्टीतून खूप महत्त्वाचं होतं.

India@75: गोळ्यांचा वर्षाव होत असताना ग्रेनेड घेऊन शत्रुच्या तंबूत शिरला अन्.. असामान्य पराक्रमाची गाथा

 केनगुरुसी यांनी या कारवाईत प्राणघातक टीमचं नेतृत्व केलं

भारतीय लष्कराच्या वतीने शत्रूचा अंत करण्याची जबाबदारी राजपुताना रायफल्सवर सोपवण्यात आली होती. त्या दिवसांत द्रास येथे तैनात असलेल्या राजपुताना रायफल्सच्या प्राणघातक गटाचे नेतृत्व कॅप्टन नेकझुको केनगुरुसी करत होते. 28 जून 1999 रोजी, कॅप्टन नीकझुको केनगुरुसी यांच्या नेतृत्वाखालील एका प्राणघातक पलटणीला ब्लॅक रॉक येथे शत्रूच्या मशीन गन शांत करण्याचे काम सोपवण्यात आले. उंच बर्फाच्छादित टेकडीवर असलेली शत्रूची मशीन गन भारतीय लष्कराच्या ऑपरेशनमध्ये सतत अडथळा आणत होती. अशा परिस्थितीत या मशीनगनला शांत करणे आणि ब्लॅक रॉकवरील असलेल्या शत्रूचा अंत करणे या टीमचं मुख्य टार्गेट होतं. ब्लॅक रॉक वर कब्जा मिळवणे म्हणजे मृत्यूच्या जबड्यात हात घालणे कॅप्टन केनगुरुसीवर सोपवण्यात आलेली जबाबदारी म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करण्यासारखी होती. कारण, खूप उंचावर बसलेला शत्रूच्या हातात अनेक गोष्टी होत्या. त्याचवेळी, भारतीय लष्कराला ज्या मार्गाने त्या चौकीवर पोहोचायचे होते, तो मार्ग थेट शत्रूच्या मशीनगन आणि तोफखाना फायरिंग रेंजमध्ये होता. एवढेच नाही तर मशीनगन पोस्टला अभेद्य बनवण्यासाठी शत्रूने आजूबाजूला सात बंकर बनवले होते आणि त्यात मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केले होते. म्हणजेच शत्रूच्या या चौकीच्या दिशेने पाऊल टाकणे म्हणजे राजपुताना रायफल्सच्या प्राणघातक गटासाठी आत्महत्या करण्यासारखे होते. वस्तुस्थिती माहीत असूनही कॅप्टन केनगुरुसी आणि त्यांचे साथीदार विजयाच्या आवेशाने ध्येयाच्या दिशेने पुढे गेले. पाक सैनिकांचे पहिले ‘नापाक’ बंकर उद्ध्वस्त कॅप्टन केनगुरुसी आणि त्यांचे कमांडो साथीदार शत्रूच्या पहिल्या बंकरच्या अगदी जवळ पोहोचले होते. शत्रूच्या लक्षात येताच त्यांनी पथकावर ग्रेनेडने हल्ला केला. हल्ला इतका जीवघेणा होता की कॅप्टन केनगुरुसींच्या पोटात ग्रेनेडचे अनेक छर्रे अडकून पडले. गंभीर जखमी होऊनही त्यांनी हिंमत सोडली नाही. त्यांच्या कमांडो साथीदारांसह लक्ष्याच्या दिशेने पुढे जात राहिले. भारतीय शूरवीरांचे धाडस पाहून शत्रूने ऑटोमॅटिक मशीनगनने गोळीबार सुरू केला. याला डेडली टीमने चोख प्रत्युत्तर दिले. कॅप्टन केनगुरुसीने रॉकेट लाँचरच्या मदतीने शत्रूचा पहिला बंकर उध्वस्त करुन शत्रूंची झोप उडवली. या कारवाईत कॅप्टन केनगुरुसीचे काही साथीदारही वीरगती प्राप्त झाले. Women@75: समुद्र असो की आकाश, या महिलांसमोर सगळेच झुकतात; स्त्री म्हणून व्हायची हेटाळणी -10 अंश सेल्सिअस तापमानात शूज काढून बर्फाच्या भिंतीवर चढले पहिले आव्हान यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर कॅप्टन केनगुरुसी आपल्या साथीदारांसह शत्रूच्या दुसऱ्या बंकरच्या दिशेने निघाले. या बंकरपर्यंत पोहोचण्यासाठी कॅप्टन केनगुरुसी आणि त्यांच्या साथीदारांना दोरीच्या साहाय्याने उंच बर्फाचा खडक चढावा लागला. कॅप्टन केनगुरुसी यांचे शूज बर्फामुळे सतत घसरत असल्याने त्यांनी अनवाणी बर्फाच्या कड्यावर चढण्याचा निर्णय घेतला. पण, हे वाटतं तिकडं सोप्प काम नव्हतं. कारण, त्यावेळी तापमान होतं -10 डिग्री सेल्सिअस तर उंची होती 16000 फूट. या रक्त गोठवणाऱ्या थंडीत त्यांनी शूज काढले आणि बर्फाच्या कड्यावर चढून शत्रूच्या दुसऱ्या बंकरपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. दुसऱ्या बंकरमधील शत्रूंचे खंजीराने केले काम तमाम कॅप्टन केनगुरुसी दुसऱ्या बंकरपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. पण, तोपर्यंत त्यांच्या गोळ्या संपल्या होत्या. आता त्यांच्याकडे फक्त एक खंजीर उरला होता. त्यांनी आपला खंजीर काढला आणि काळ बनून शत्रूंवर तुटून पडले. या अचानक झालेल्या हल्ल्याची शत्रूला कल्पना नव्हती. कॅप्टन केनगुरुसी आणि बंकरमध्ये असलेल्या पाकिस्तानी सैनिकांमध्ये घनघोर युद्ध झाले. पण शूर कॅप्टन केनगुरुसीसमोर शत्रूंचा एकही हात चालला नाही. कॅप्टनने आपल्या खंजीराने शत्रू सैन्याच्या दोन सैनिकांना ठार केले. शरीरात लागलेल्या गोळ्यांच्या वेदना विसरून कॅप्टन केनगुरुसी यांनी एकट्याने शत्रूचे दोन बंकर जमीनदोस्त करून सर्व पाकिस्तानी सैनिकांचा अंत केला. देशासाठी प्राणाचे सर्वोच्च बलिदान गंभीर जखमी होऊन आणि शत्रूचे दोन बंकर जमीनदोस्त होऊनही कॅप्टन केनगुरुसीची शत्रूंचा खात्मा करण्याची ‘भूक’ अजून शमली नव्हती. आता त्यांच्या निशाण्यावर तिसरा बंकर होता. ते त्या दिशेने पुढे गेले. पण, अचानक शत्रूच्या मशीनगनने गोळ्या झाडायला सुरुवात केली. कॅप्टन केनगुरुसीच्या शरीरावर अनेक गोळ्या लागल्या ज्यामुळे ते खोल दरीत कोसळले. राजपुताना रायफल्सचे कॅप्टन नेकझुको केनगुरुसी यांनी शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूचा सामना केला आणि देशासाठी आपल्या प्राणाचे सर्वोच्च बलिदान दिले. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी हौतात्म्य पत्करणारे कॅप्टन केनगुरुसे यांना त्यांच्या अदम्य साहस आणि सर्वोच्च बलिदानासाठी देशाचा दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार महावीर चक्र प्रदान करण्यात आला. कारगिल युद्धात देशासाठी प्राणाची आहुती देणारे कॅप्टन नेकझुको केनगुरुसी हे आर्मी सर्व्हिस कॉर्प्स (ASC) कडून महावीर चक्र प्राप्त करणारे पहिले लष्कर अधिकारी होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात