जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम, निलोफर करते, आतापर्यंत हे फक्त पुरुषांचे काम मानलं जात होतं. यामुळे त्यांना कर्तव्य बजावताना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातील एक अडचण म्हणजे स्वच्छतागृह. बहुतेक जहाजांमध्ये पुरुष काम करतात. यापूर्वी कोणत्याही महिलेने अशा जहाजावर काम केलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे महिलांची स्वच्छतागृहेही नाहीत. (फोटो ट्विटर @रेशमा_निलोफर)
तासन् तास समुद्रावर राबणाऱ्या निलोफर यांना आणखी एका अडचणीला सामोरे जावे लागते, ते म्हणजे त्यांच्याकडून ऑर्डर घेण्यास पुरुष कर्मचाऱ्यांना होणारा संकोच. त्या म्हणतात की, माझ्या एका सहकाऱ्याने माझ्या आदेशावर काम करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. त्याने मला गप्प बसायला सांगितलं. पण त्याला माझे ऐकावे लागेल असे मी त्याला सांगितले. (फोटो ट्विटर @रेशमा_निलोफर)
निलोफरप्रमाणेच अर्चना झा यांनीही अथांग समुद्रात स्वत:ला सिद्ध केलंय. अर्चना मूळची बिहारच्या पाटणा येथील असून, ती सध्या मुंबईत मरीन ऑडिटर म्हणून कार्यरत आहे. मला हे काम करताना पाहून केवळ पुरुषच नाही तर महिलाही हैराण झाल्याचं ती सांगते. एकदा माझ्या काकांनी डीजी शिपिंगला फोन करून विचारले होते की मुलींना समुद्रात काम करण्याची परवानगी आहे का? सुरुवातीला पुरुष अधिकारी मी ऑईल टँकरवर काय करणार या संभ्रमात होते. त्यामुळे सकाळी उठल्यावर ते मला ऑईल टँकरवर जायचं सागून प्रवासी जहाजावर पाठवायचे. पण, खूप आढेवेढे घेतल्यानंतर त्यांनी मला ऑईल टँकरवर पाठवले.
देशातील पहिली महिला विमान वाहतूक अग्निशामक तानिया सन्याल हिचे कामही खूप आव्हानात्मक आहे. कोलकात्याची रहिवासी असलेली तानिया सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणात कार्यरत आहे. तिने सांगितले की मला काहीतरी वेगळे करायचे आहे. एमएस्सी झाल्यावर काय करावं समजत नव्हतं. मग मी एक जाहिरात पाहिली आणि मी अर्ज केला, तेव्हा मला विमान फायर फायटर म्हणजे काय हे देखील माहित नव्हते.
तानिया म्हणते की आमचे काम विमान, त्यातील प्रवासी आणि क्रू मेंबर्सना मदत पुरवणे आहे. त्यात प्रतिबंध, प्रथमोपचार अशा अनेक कामांचा समावेश आहे. ती म्हणते की मी खेळात सक्रिय आहे. तरीही मला हे ट्रेनिंग खूप कठीण गेले. पण, मी कधीच हे सोडण्याचा विचार केला नाही. मला स्वत:ला तसेच इतर महिलांसमोर सिद्ध करायचे आहे. त्यांनी सांगितले की, हे असे काम आहे की, फार कमी महिला ते करण्यासाठी धैर्य दाखवू शकतात. (फोटो ट्विटर @TaniyaSanyalFF)