जेरुसलेम, 19 जुलै : इस्त्रायली पोलिसांनी शनिवारी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्यांविरोधात वॉटर कॅननचा उपयोग केला होता. आंदोलनकर्त्यांनी नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचारचा आरोप आणि कोरोना व्हायरस संकटाशी दोन हात करण्यासाठी अयशस्वी ठेरलेल्या रणनीतीसाठी आंदोलन सुरू आहे.
वाढणारी बेरोजगारी, कोविड-19 रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना व्हायरसमुळे पुन्हा लागू केले जाणाऱ्या अटींमुळे जनता सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे.
नेत्यानाहूंवर भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा आरोप
नेतान्याहू यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे जनतेमध्ये राग आहे. मे महिन्यात त्यांच्यावर लाच, फसवणूक आदी अनेक आरोपांमुळे केसेस झाल्या. मात्र वारंवार ते या आरोपांबाबत नकार देत आहेत. शेकडो लोक जेरुसलेममधील प्रधानमंत्री निवासाबाहेर येत नेतान्याहू यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी जमाव फैलावण्यासाठी वॉटर कॅननचा उपयोग केला. या प्रकरणात पोलिसांना दोघांना ताब्यात घेतलं आहे.
हे वाचा-एका क्षणात नाल्यात वाहून गेली घरं, दिल्लीतील पावसाचा हाहाकार दाखवणारा VIDEO
इस्त्राइलमध्ये बेरोजगारीत वाढ
इस्त्राइलमधील वाणिज्यिक केंद्र तेल अवीवमध्ये एका बिचवर हजारों लोकांनी रॅली काढली आणि कोरोनामुळे नुकसान सहन करीत असलेली जनता यामध्ये सहभागी झाली. गेल्या चार महिन्यांहून अधिक काळापासून जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. माक्ष अद्यापही त्यावर नियंत्रण आणणे शक्य झालेले नाही. काही देशांमध्ये लॉकडाऊन हटविण्यात आला असला तरी अचानक कोरोना रुग्णांची संख्या उसळी मारत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांना अशा भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र फार काळ लॉकडाऊन लागू करावे लागत असल्यामुळे नागरिकांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे.