• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • न्यायाधीश हत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; 'त्या' Video मुळे एक पोलिसही निलंबित

न्यायाधीश हत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; 'त्या' Video मुळे एक पोलिसही निलंबित

या प्रकरणात 243 जणांना ताब्यात घेतलं आहे.

 • Share this:
  धनबाद, 2 ऑगस्ट : झारखंडमधील धनबादमधील (Dhanbad) अतिरिक्त जिला सत्र न्यायाधीश (अष्टम) उत्तम आनंद (Pure Bliss) यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर धनबाद पोलिसांनी रविवारी 243 लोकांना ताब्यात घेतलं आहे. तर 17 जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. धनबादचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजीव कुमार (Superintendent of Police Sanjeev Kumar) यांनी सांगितलं की, न्यायाधीशांचा संशयास्पद मृत्यू प्रकरणात 243 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. (Judge Uttam Anand Murder) याशिवाय 17 संशयास्पद नागरिकांना अटक केलं आहे. तर न्यायाधीशांना धडक देणाऱ्या रिक्षेच्या चोरीची तक्रार दाख करून घेण्यास उशिर केल्या प्रकरणात पाथरडीह ठाण्याचे प्रभारी यांना निलंबित करण्यात आलं. तर अपघाताचा सीसीटीव्ही फुजेट सार्वजनिक केल्याच्या आरोपाखाली एका पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 28 जुलै रोजी न्यायाधीश आनंद मॉर्निंग वॉकसाठी बाहेर गेले होते आणि वाटेत त्यांना एका रिक्षाने मागून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. झारखंड उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पोलीस महासंचालकांनी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) ची स्थापना केली आहे. पोलिसांनी सांगितले होते की, ऑटो चालक लखन कुमार वर्मा हा धनबाद येथील सुनार पट्टीचा रहिवासी आहे. हे ही वाचा-RSS पदाधिकाऱ्याच्या घरावर दरोडा घालणाऱ्याची अशी अवस्था; पाहा VIDEO तर दुसरा आरोपी राहुल वर्मा हा देखील स्थानिक रहिवासी आहे. लखन कुमार वर्मा याने कबूल केलं आहे की, तो घटनेच्या वेळी ऑटो चालवत होता. त्याला गिरिडीह येथून अटक करण्यात आली, तर दुसरा आरोपी राहुल वर्माला धनबाद स्थानकातून अटक करण्यात आली. दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची सीबीआयला शिफारस केली आहे. 100 हून अधिक ऑटो पकडले गेले धनबाद जिल्हा सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्याच्या प्रयत्नात रविवारी शंभराहून अधिक ऑटो पकडण्यात आल्या आहेत. या सर्व ऑटो सदर पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आल्या आहेत. एकीकडे पोलीस स्टेशन कॉम्प्लेक्स ऑटो स्टँडसारखे दिसू लागले आहे आणि दुसरीकडे पोलिसांच्या या कारवाईनंतर ऑटो चालक आणि मालक दोघेही अस्वस्थ आहेत. प्रत्यक्षात न्यायाधीशांच्या मृत्यूचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर ऑटोला धडक देण्याची बाब समोर आली. सध्या, एसआयटी या प्रकरणाच्या तपासात गुंतलेली आहे.  
  Published by:Meenal Gangurde
  First published: