श्रीनगर, 05 फेब्रुवारी: जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir police) शुक्रवारी एका पत्रकाराला (journalist) अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला पत्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्यांचा (terrorist attacks) गौरव करत होता. आरोपी पत्रकार भारताच्या सुरक्षा यंत्रणांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतो, असंही पोलिसांनी म्हटलं आहे. त्याच वेळी त्याचा हेतू देशाविरूद्ध दुर्भावना आणि असंतोष निर्माण करण्याचा होता. आरोपी फदद शाह हा 'thekashmirwalla' या ऑनलाइन न्यूज मॅगझिनचा मुख्य संपादक आहे.
पुलवामा येथील जिल्हा पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे कि, काही फेसबुक यूजर आणि पोर्टल लोकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या गुन्हेगारी हेतूनं चित्रे, व्हिडिओ आणि पोस्टसह देशविरोधी गोष्टी अपलोड करत आहेत. अशा प्रकारे अपलोड केलेले साहित्य कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्यासाठी जनतेला भडकवू शकते.
मोठी बातमी: विमान कोसळलं, विमानातल्या सातही जणांचा मृत्यू
पोलिसांनी सांगितलं कि, या प्रकरणाच्या एफआयआर क्रमांक 19/2022 अंतर्गत तपासादरम्यान शाह याला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं निवेदनात म्हटलं आहे.
शाह याला पोलिसांनी 1 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावलं होतं. शुक्रवारी, त्याला पुलवामा पोलीस ठाण्यात त्याचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले, त्यानंतर पोलिसांनी त्याच्या अटकेची पुष्टी करणारे निवेदन जारी केलं.
हे डिजिटल मासिक 2011 मध्ये सुरू झालं, ज्यामध्ये जम्मू आणि काश्मीरमधील बातम्या आणि इतर सामाजिक-सांस्कृतिक समस्यांवर अहवाल दिला जातो.
गेल्या महिन्यात कश्मीरवाला येथील प्रशिक्षणार्थी पत्रकार सज्जाद गुल यालाही सरकारच्या विरोधात लोकांना भडकवण्याच्या आणि शत्रुत्व पसरवण्याच्या उद्देशानं ट्वीट पोस्ट केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्यानंतर गुल याच्यावरही सार्वजनिक सुरक्षा कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:Pooja Vichare
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.