मराठी बातम्या /बातम्या /देश /

नोकरी गेली, घरी जाण्यासाठी पैसे नाहीत, तो 300 किमी चालला, आणि...

नोकरी गेली, घरी जाण्यासाठी पैसे नाहीत, तो 300 किमी चालला, आणि...

सैनिकांमुळे एक बेरोजगार व्यक्तीला आधार मिळाला. नोकरी गेल्यानं हताश झालेली ही व्यक्ती पैसे आणि फोन नसल्याने पायीच घरी निघाली. सलग बारा दिवस 300 किलोमीटर्स अंतर पायी कापल्यानंतर सैनिकांनी (soldiers) या व्यक्तीला घरी जाण्यासाठी मदत केली

सैनिकांमुळे एक बेरोजगार व्यक्तीला आधार मिळाला. नोकरी गेल्यानं हताश झालेली ही व्यक्ती पैसे आणि फोन नसल्याने पायीच घरी निघाली. सलग बारा दिवस 300 किलोमीटर्स अंतर पायी कापल्यानंतर सैनिकांनी (soldiers) या व्यक्तीला घरी जाण्यासाठी मदत केली

सैनिकांमुळे एक बेरोजगार व्यक्तीला आधार मिळाला. नोकरी गेल्यानं हताश झालेली ही व्यक्ती पैसे आणि फोन नसल्याने पायीच घरी निघाली. सलग बारा दिवस 300 किलोमीटर्स अंतर पायी कापल्यानंतर सैनिकांनी (soldiers) या व्यक्तीला घरी जाण्यासाठी मदत केली

पुढे वाचा ...
सध्याच्या काळात नोकरी (Job) मिळणं आणि ती टिकणं किंवा टिकवणं अवघड झालं आहे. अनेक जण कुटुंबाच्या पालनपोषणासाठी मिळेल ते काम करतात आणि पैसे मिळवतात. अशा व्यक्तींना ना उत्पन्नाची हमी असते ना नोकरी टिकण्याची; पण तरीही ते प्रयत्न आणि कष्ट सोडत नाहीत. सध्या थायलंडमधल्या (Thailand) एका व्यक्तीबद्दल या संदर्भाने खूप चर्चा आहे. नोकरी गेल्यामुळे बेरोजगार झालेली ही व्यक्ती घरी परतण्यासाठी सुमारे बारा दिवस चालत होती. ही व्यक्ती 300 किलोमीटर्स (Walking) चालली; पण घर खूप दूर होतं. मग त्या व्यक्तीला घरी पोहोचण्यासाठी सैनिकांनी मदत केली. नोकरी गेल्यानं हताश झालेली ही व्यक्ती पैसे किंवा फोन जवळ नसल्याने पायी घराकडे परतत होती. या थाई व्यक्तीची (Thai Person) कहाणी काळजाला चटका लावणारी आहे. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सैनिकांमुळे एक बेरोजगार व्यक्तीला आधार मिळाला. नोकरी गेल्यानं हताश झालेली ही व्यक्ती पैसे आणि फोन नसल्याने पायीच घरी निघाली. सलग बारा दिवस 300 किलोमीटर्स अंतर पायी कापल्यानंतर सैनिकांनी (soldiers) या व्यक्तीला घरी जाण्यासाठी मदत केली. अन्यथा या व्यक्तीला घरी जाण्यासाठी 1350 किलोमीटर्स अंतर चालावं लागलं असतं. ही कहाणी आहे थायलंडमधल्या 42 वर्षांच्या चोई नावाच्या व्यक्तीची. चोई थायलंडच्या दक्षिण प्रांतातल्या सोंगखला येथे नोकरी करत होता; पण नोकरी गेल्यानं तो दुसरं काम शोधत होता. परंतु, काम मिळत नसल्याने तो हताश झाला होता. त्यानंतर त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला. जवळ पैसे किंवा फोन नसल्याने तो रविवारी पायी चालत पथालंग प्रांतात पोहोचला. तिथे थाई सैनिकांनी त्याला मदत केली आणि रेल्वे तिकिटासाठी पैसे दिले. त्यानंतर रेल्वेनं 13 तास प्रवास करून तो पथालंगवरून हुआ लँफोंग रेल्वे स्टेशनवर (बॅंकॉक) पोहोचला. बॅंकॉकवरून (Bangkok) आठ तासांचा प्रवास करून तो बरीरामला पोहोचला. तिथं त्याची 81 वर्षांची आजी ला हिनं त्याचं स्वागत केलं आणि त्याच्या हातात धागा बांधला. चोई 300 किलोमीटर अंतर चालल्याचं त्याच्या आजीला समजलं तेव्हा ती खूप भावूक झाली. `सैन्यानं मदत केली नसती तर माझ्या नातवाचा प्रवास खूप लांबला असता,` अशी प्रतिक्रिया आजीनं व्यक्त केली. कारण सोंगखला ते बरीराम हे अंतर 1350 किलोमीटर्स आहे. (आईने गाजर खाताच गर्भातल्या बाळाचा चेहरा खुलतो? वैज्ञानिकांचा दावा) सात महिन्यांपूर्वी चोई थावी जिल्ह्यातल्या (सोंगखला) रबराच्या (Rubber) मळ्यात काम करण्यासाठी आला होता. तिथे कष्टानं पैसे कमावून कुटुंबीयांना मदत करू, असं त्याला वाटत होतं. कामाची सुरुवात चांगली झाली. तो रोज 650 रुपये कमावू लागला. रबराची झाडं कापण्याचं काम चोईला मिळालं होतं; पण काही महिन्यांनी चोईला काम मिळणं बंद झालं. त्यामुळे मोठ्या मुश्किलीने पैसे मिळत होते. त्यामुळे त्याने कुटुंबाला पैसे पाठवणं बंद केलं. त्यानंतर 5 सप्टेंबरला चोईने गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला; पण त्या वेळी त्याच्याकडे पैसे आणि फोनही नव्हता. त्यामुळे चोई बारा दिवसांत 300 किलोमीटर चालला. या पायी प्रवासादरम्यान त्याने मंदिरांमध्ये मुक्काम केला. तिथल्या बौद्ध भिक्खूंनी त्याला जेवू घातलं. रविवारी तो पथालंग प्रांतात पोहोचला असता, त्याने थाई सैनिकांकडे पिण्यासाठी पाणी मागितलं. चोई हा कोणी गुन्हेगार असावा, असं सैनिकांना वाटलं. त्यामुळे त्यांनी चोईची चौकशी केली. त्यानंतर सैनिकांनी त्याला विमान प्रवासासाठी पैसे देऊ केले; पण विमान प्रवासाविषयी चोईला माहिती नव्हती. त्यानंतर सैनिकांनी त्याला दोन हजार रुपये दिले आणि रेल्वे स्टेशनवर सोडलं. अशा पद्धतीनं चोई अखेर घरी पोहोचला.
First published:

Tags: Job

पुढील बातम्या