मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आईने गाजर खाताच गर्भातल्या बाळाचा चेहरा खुलतो? वैज्ञानिकांचा दावा

आईने गाजर खाताच गर्भातल्या बाळाचा चेहरा खुलतो? वैज्ञानिकांचा दावा

'अर्भकाच्या गंध व चवीच्या संवेदना आईच्या पोटातच होतात विकसित'

'अर्भकाच्या गंध व चवीच्या संवेदना आईच्या पोटातच होतात विकसित'

अर्भकाला आईच्या पोटात असल्यापासून वास व चवीची ओळख असते, असा निष्कर्ष या संशोधनात काढण्यात आला.

    जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आवडी-निवडी असतात. त्याबद्दल अगदी बालवयापासून प्रत्येक जण व्यक्त होत असतं. इतकंच नाही, तर आईच्या पोटात असल्यापासूनच अर्भकाला स्वतःच्या आवडी-निवडी (Study Reveals That Fetus Knows Taste And Smell In Womb) असतात. हे सिद्ध करणारं एक संशोधन ब्रिटनमधल्या डरहॅम युनिव्हर्सिटीत करण्यात आलं. अर्भकाला आईच्या पोटात असल्यापासून वास व चवीची ओळख असते, असा निष्कर्ष या संशोधनात काढण्यात आला. लहान मुलांना पालेभाज्या अजिबात आवडत नाहीत. पालक, भेंडी, शेपू, कोबी या भाज्यांचं नाव घेतलं तरी मुलं नाकं मुरडतात, ही सार्वत्रिक ओरड आहे. लहान मुलांची ही आवड आईच्या पोटात असल्यापासूनच तयार होत असते. या संदर्भात इंग्लंडमधल्या शास्त्रज्ञांनी केलेलं एक संशोधन अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारं आहे. त्या संशोधनात असं आढळलं, की पोटातल्या अर्भकाचा चेहरा आईने गाजर खाल्ल्यावर आनंदी (Babies In Womb Smile To Carrot Flavour) झाला, तर पालेभाजी खाल्ल्यावर अर्भकाचा चेहरा (Fetus Feels Sad For Green Vegetables) पडला होता. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या डरहॅम युनिव्हर्सिटीत फीटल अँड निओनॅटल रिसर्च लॅबमध्ये स्त्रियांच्या पोटातल्या गर्भावर एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनातून निघालेले निष्कर्ष आश्चर्यकारक होते. जन्माला येण्याआधीच अर्भकं गंध आणि चवीबद्दल प्रतिक्रिया देऊ लागतात. म्हणजेच खाण्याबाबतच्या त्यांच्या जाणिवा जन्माला येण्याआधीच विकसित झालेल्या असतात, असं यात दिसून आलं. (दारु पिण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड, 17 तासांत 67 पब्जमध्ये मद्यपान, ठरला जागतिक विक्रम) सायकॉलॉजिकल सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, 100 गरोदर स्त्रियांवर हे संशोधन करण्यात आलं. या स्त्रिया 18 ते 40 या वयोगटातल्या, तसंच 32 ते 36 आठवड्यांच्या गरोदर होत्या. त्यापैकी 35 स्त्रियांना गडद रंगाची कोबीपासून बनलेली कॅप्सूल खायला आली. 35 महिलांना गाजरापासून बनवलेली कॅप्सूल देण्यात आली. उरलेल्या 30 स्त्रियांना कोणतीच कॅप्सूल देण्यात आली नाही. 4D अल्ट्रा स्कॅनद्वारे या पोटातल्या अर्भकांच्या प्रतिक्रियांचा अभ्यास करण्यात आला. 4D स्कॅनिंग करण्यात आलं त्या दिवशी त्या स्त्रियांना गाजर किंवा कोबी खाऊ नये असं सांगण्यात आलं होतं. स्कॅनिंगच्या एक तास आधी तर काहीही खाण्यास किंवा पिण्यास त्यांना मनाई करण्यात आली होती. त्या स्त्रियांना कॅप्सूल दिल्यानंतर 20 मिनिटांनी स्कॅन केलं, तेव्हा गाजराची कॅप्सूल खाल्लेल्या स्त्रियांच्या पोटातल्या अर्भकाचा चेहरा हसरा असल्याचं दिसून आलं. कोबीची कॅप्सूल खाल्लेल्या स्त्रियांच्या पोटातल्या अर्भकांचा चेहरा मात्र उदास दिसत होता. “अर्भकांमध्ये चव आणि वास ओळखण्याची किती क्षमता असते, हे जाणून घेण्यासाठी हे संशोधन करायचं ठरवलं,” असं प्रमुख संशोधक बेजा उस्तुन यांनी सीएनएनशी बोलताना सांगितलं. गर्भावस्थेतल्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये अर्भकांच्या जाणिवा भरपूर विकसित झालेल्या असतात. आईनं खाल्लेल्या पदार्थाची चवही ते ओळखू शकतात असं या अभ्यासावरून लक्षात आल्याचं त्यांनी सांगितलं. सोशल मीडियावरही या संशोधनाबाबत चर्चा झाली.
    First published:

    पुढील बातम्या