मराठी बातम्या /बातम्या /देश /Job Market: कोरोनाच्या संकटात या 5 क्षेत्रात आहेत नोकरीच्या संधी, करू शकता प्रयत्न!

Job Market: कोरोनाच्या संकटात या 5 क्षेत्रात आहेत नोकरीच्या संधी, करू शकता प्रयत्न!

पर्यटन, वाहतूक या क्षेत्रांना सगळ्यात मोठा फटका बसला असून त्यात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

पर्यटन, वाहतूक या क्षेत्रांना सगळ्यात मोठा फटका बसला असून त्यात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

पर्यटन, वाहतूक या क्षेत्रांना सगळ्यात मोठा फटका बसला असून त्यात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

नवी दिल्ली 18 ऑगस्ट: देशात कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांना रोजगार गमवावा लागला. अशी परिस्थिती असतांनाही काही सेक्टर्समध्ये आता नोकराच्या संधी वाढत असल्याची माहिती पुढे येत आहे. प्रत्येक संकटामध्येही काही संधीही असतात त्यामुळे या क्षेत्रांकडे तरुणांनी अधिक लक्ष द्यावं असं मत या क्षेत्रातल्या जाणकारांनी व्यक्त केलं आहे. एका सर्व्हेत अशा प्रकारची पाच क्षेत्र पुढे आली असून त्याचा फायदा आता तरुणांना होणार आहे.

देशात एप्रिल कडक लॉकडाऊन होता. त्यामुळे रोजगाराच्या नव्या निच्चांकी पातळीवर आल्या होत्या. आता सगळे व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असल्यामुळे नवीन नोकऱ्याही निर्माण होत आहेत.

देशात सॉफ्टवेयर इंजिनियर (Software Engineer), बिझनेस डेव्हलपमेंट (Business Development) सेल्स मॅनेजर (Sales Manager),  फार्मा (Pharmacy) आणि आयुर्वेदीक औषधी (Ayurvedic Medicine) या पाच क्षेत्रांमध्ये या नोकरीच्या संधी निर्माण होत असल्याचं आढळून आलंय. Economic Timesने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

सुशांत आणि दिशाच्या रिलेशनवर आरोप करणाऱ्यांना चपराक, झाला मोठा खुलासा

पर्यटन, वाहतूक या क्षेत्रांना सगळ्यात मोठा फटका बसला असून त्यात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे आता नव्या संधी शोधल्या पाहिजेत असं आवाहन करण्यात येत  आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 27 लाख 2 हजार 743 झाली आहे. 24 तासांत 55 हजार 079 नवीन प्रकरणं सापडली तर, 876 लोकांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 6 लाख 73 हजार 166 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 51 हजार 797 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकूण 19 लाख 77 हजार 780 रुग्ण निरोगीही झाले आहेत. यासह देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर 73.17% झाला आहे.

बॉलिवूड माफिया मुद्द्यावरुन नसीरुद्दीन शाहांना कंगना रणौतचं जोरदार प्रत्युत्तर

मुख्य म्हणजे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि बिहारमधील नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाला आहे. महाराष्ट्रात सोमवारी 8,493 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 6,04,358 झाली. तर एका दिवसात 11,391 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही 4,28,514वर पोहोचली आहे.

First published: