Home /News /national /

लग्नाचा प्रस्ताव नाकारला; संतप्त तरुणाने बंदुकीचा धाकावर कुटुंबाला ठेवलं ओलीस आणि मग...

लग्नाचा प्रस्ताव नाकारला; संतप्त तरुणाने बंदुकीचा धाकावर कुटुंबाला ठेवलं ओलीस आणि मग...

लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर संतप्त झालेल्या तरुणाने बंदुकीच्या धाकावर मुलीच्या कुटुंबाला ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    भुवनेश्वर, 15 जून: लग्नाचा प्रस्ताव नाकारला (Marriage proposal rejected) म्हणून संतप्त झालेल्या एका तरुणाने धक्कादायक कृत्य केले आहे. या तरुणाने मुलीच्या नातेवाईकांना बंदुकीचा धाक दाखवत ओलीस (hostage at gun point) ठोवले. ओडिशातील बोलांगीर येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि या तरुणाची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. ओडिशातील बोलंगीर येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने आपल्याच एका नातेवाईकाने मुलीसाठी दिलेला लग्नाचा प्रस्ताव नाकारला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या तरुणाने बंदुकीच्या धाकावर मुलीच्या कुटुंबाला ओलीस ठेवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिक्रम पांडा हा मुलीच्या घरात शिरला आणि त्यानंतर त्याने बंदूकीच्या धाकावर संपूर्ण कुटुंबाला बंधक बनवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या तरुणाची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले. तब्बल 5 तसांच्या प्रयत्नांनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना ओलीस ठेवलेल्या या कुटुंबाची सुरक्षित सुटका केली आणि आरोपीला अटक केली. कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण; माजी आमदार विवेक पाटील यांना अटक पोलिसांनी सांगितले की, पीडित कुटुंबाची भाची हॉस्पिटलमध्ये काम करते. आरोपी तरुण हा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या पीडित कुटुंबाच्या भाचीच्या प्रेमात होता. या तरुणाने आपल्या लग्नाचा प्रस्ताव मुलीच्या कुटुंबीयांकडे दिला होता मात्र, तो मुलीच्या नातेवाईकांना फेटाळला. पोलिसांकडून सुटका कऱण्यात आल्यावर पीडित कुटुंबाने सांगितले की, त्याने माझ्या डोक्यावर बंदूक रोखून धरली होती आणि भाचीला आणण्यास सांगितले. मी सांगितले की, ती आता घरी नाहीये. त्यानंतरही तो ऐकायला तयार नव्हता. पोलिसांनी सांगितले की, पीडित परिवाराची सुटका केल्यावर आरोपीने स्वत:ला एका खोलीत बंद केले आणि धमकी दिली माझ्या आसपास कुणी आले तर गोळी झाडेल. तब्बल पाच तासांनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Marriage, Odisha

    पुढील बातम्या