मुंबई, 15 जून: रायगड जिल्ह्यातील कर्नाळा बँक घोटाळा (Karnala Bank Scam) प्रकरणात ईडी **(ED)**ने मोठी कारवाई केली आहे. या घोटाळा प्रकरणात शेकापचे माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील (Ex MLA Vivek Patil) यांना ईडीने अटक केली आहे. हा संपूर्ण घोटाळा विवेक पाटील यांनीच केला असल्याचा आरोप यापूर्वी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. बँकेत 1 हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याने या प्रकरणाचा तपास सुरू होता. आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात विवेक पाटील यांना अटक केली आहे.
ED ईडीने माजी आमदार विवेक पाटीलना ₹800 कोटीचा करनाळा सहकारी बँकेच्या घोटाळासाठी अटक केली.
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 15, 2021
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि मी १८ महिन्यांपासून या बँकेच्या लहान ठेवीदारांसाठी संघर्ष करीत आहोत @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/kgYFpYP06F
कर्नाळा नागरी सहकारी बँक (Karnala Cooperative Bank) ही रायगड जिल्ह्यातील (Raigad District) एक प्रसिद्ध बँक होती. मात्र, या बँकेत कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा गैरव्यवहार बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनीच केल्याचा आरोप करण्यात आला होता. या बँकेचे सहकार खात्याने आणि रिझर्व्ह बँकेने ऑडिट केले असता करोडो रूपयांची बेनामी खाती असल्याचं समोर आलं. बेनामी खातेधारकांच्या नावाने खाते उघडून त्यात करोडो रुपयांची कर्जरूपी रक्कम देवून ती आपल्या मालकीच्या ट्रस्टमध्ये विवेक पाटील यांनी वळती केल्याचा आऱोपही करण्यात आला होता. बँकेत झालेल्या या गैरव्यवहार प्रकरणाचा भाजप नेते किरीट सोमय्या आणि भाजपचे पनवलेचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांनी सातत्याने पाठपुरवठा केला होता. परिषद घेत किरीट सोमय्या यांनी गेल्यावर्षी एक पत्रकार घेत आरबीआयच्या स्पेशल ऑडिटमध्ये विवेक पाटील दोषी असल्याचंही म्हटलं होतं. आता या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यावर शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अटक केली आहे.