जाहिरात
मराठी बातम्या / देश / आईनं धर्मांतर केलं म्हणून मुलगा होता नाराज, उचललं टोकाचं पाऊल!

आईनं धर्मांतर केलं म्हणून मुलगा होता नाराज, उचललं टोकाचं पाऊल!

आईनं धर्मांतर केलं म्हणून मुलगा होता नाराज, उचललं टोकाचं पाऊल!

या मुलाच्या आईनं ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यामुळे तो नाराज होता. त्या नाराजीमुळेच त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. आता या प्रकरणावर राजकारण सुरू झालं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

रांची, 28 फेब्रुवारी : आईनं धर्मांतर (Conversion)  केल्याच्या कारणामुळे नाराज झालेल्या तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मुलाच्या आईनं ख्रिश्चन धर्म स्विकारला होता. त्यामुळे तो नाराज होता. त्यानं या नाराजीमुळे विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या (Suicide) केली. झारखंड (Jharkhand) मधील चतरा जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. सुरज कुमार असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव असून तो कटिया या गावातील रहिवाशी आहे. सुरजच्या गावातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘त्यांच्या गावात धर्मांतर करणारे काही खास लोकं आले होते. त्यांनी गावातील गरीब आदिवासी लोकांना कथित प्रलोभन दाखवून धर्म परिवर्तानासाठी तयार केलं. त्यांच्या प्रलोभनाला बळी पडत गावातील अनेक आदिवासी कुटुंबांनी ख्रिश्चन धर्माचा स्विकार केला. धर्म परिवर्तन करणाऱ्या मंडळींमध्ये सूरजच्या आईचा देखील समावेश होता.’ सुरजला आईचं धर्म परिवर्तन मान्य नव्हतं. या विरोधातूनच त्यानं हा टोकाचा निर्णय घेतला. या आत्महत्येनंतर झारखंडमध्ये धर्म परिवर्तनाचा (Religious Conversion) प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी सुरजचा मृतदेह विहिरीमधून बाहेर काढला आणि पोस्टमार्टमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून काय माहिती मिळते याची पोलिसांना प्रतीक्षा आहे. ( वाचाAyodhya: राम मंदिरासाठीची दान मोहिम पूर्ण; आतापर्यंत तब्बल 2000 कोटी रुपये जमा  ) झारखंडमध्ये धर्म परिवर्तनाचा मुद्दा जुनाच आहे. या प्रश्नावर यापूर्वी देखील गदारोळ आणि राजकारण झालं आहे. चतरामधील ताज्या प्रश्नानंतर राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजपा आक्रमक झाला आहे. ‘झारखंडमध्ये यापूर्वी भाजपाच्या रघुवर दास यांचं सरकार होतं. त्या सरकारचं धर्मांतराबाबतचे धोरण कठोर होते. त्यामुळे तेव्हा अशा प्रकारच्या घटना घडत नव्हत्या. झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) सरकार सत्तेवर आल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. चतराच्या प्रकरणात लवकरात लवकर करावाई करण्यात यावी,’ अशी मागणी भाजपानं केली आहे. धर्मांतराच्या मुद्यावर सरकार गंभीर आहे. चतरातील प्रकरणात दोषी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असं वक्तव्य काँग्रेस नेते किशोर नाथ शाहदेव यांनी केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात