मराठी बातम्या /बातम्या /देश /तरुणाने दृष्टिहीनांसाठी बनवली अनोखी स्टिक, सहज सापडेल रस्ता अन् सांगणार धोके

तरुणाने दृष्टिहीनांसाठी बनवली अनोखी स्टिक, सहज सापडेल रस्ता अन् सांगणार धोके

jhansi

jhansi

सुमित शर्मा यानं तयार केलेली स्टिक नेत्रहीन व्यक्तींसाठी वरदान ठरेल, यात शंका नाही. त्यांच्या मार्गात येणारे अडथळे समजण्यास या स्टिकची त्यांना मदत होईल. तसंच ते हरवल्यास त्यांना शोधणंही सोपं जाईल.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

    झाशी, 09 फेब्रुवारी : समाजात अनेक दिव्यांग व्यक्ती असतात. त्यांचं आयुष्य अनेक समस्यांनी भरलेलं असतं. प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात. समाजातलेच काही घटक सातत्यानं त्यांचं आयुष्य सुरळीत चालण्यासाठी प्रयत्न करत असतात. काही संस्था तसंच काही व्यक्ती आपापल्या परीनं या व्यक्तींना आधार देतात. याच जाणीवेतून झाशीमधल्या एका तरुणाने दृष्टिहीनांसाठी एक अनोखी स्टिक तयार केलीय. त्या स्टिकचं वैशिष्ट्य असं, की त्यात नेव्हिगेशन सिस्टीम बसवलेली आहे. त्यामुळे रस्ता सापडणं सोपं होईल. तसंच समोर येणाऱ्या अडथळ्यांपासून सावध करण्याची यंत्रणाही त्यात आहे.

    दृष्टिहीनांना आयुष्यात खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. निरीक्षण करण्यासाठी, ओळखण्यासाठी त्यांच्याकडे दृष्टीच नसते. समाजात वावरताना अशा व्यक्तींना खूप अडथळे येतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, वाचणं, पाहून प्रतिक्रिया देणं त्यांना शक्य होत नाही. त्यावर त्यांच्या परीने ते मार्ग काढतातही; मात्र झाशीतल्या एका तरुणाने अशा दृष्टिहीनांसाठी एक अनोखी स्टिक तयार केलीय.

    हेही वाचा : Generic Aadhaar : ठाण्याच्या तरुणाच्या कल्पनेमुळे लाखो रुग्णांचा होतोय फायदा, पाहा Video

    इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेला सुमित शर्मा नावाचा तरुण झाशीच्या भेल कॉलनीमध्ये राहतो. उदयपूरमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यानं त्याच्या शिक्षणाचा चांगल्या कामासाठी उपयोग करायचा असं ठरवलं होतं. त्याच्या कॉलेजच्या जवळ एका मंदिरात रोज तो एका नेत्रहीन व्यक्तीला पाहत असे. त्या व्यक्तीला घरी जाण्यासाठी रस्ता ओलांडणं खूप अवघड जायचं. ते पाहून सुमितला नेत्रहीन व्यक्तींसाटी स्टिक तयार करण्याची कल्पना सुचली.

    ही काठी खूप प्रयत्न करून तयार केल्याचं तो सांगतो. या स्टिकमध्ये नेव्हिगेशन यंत्रणा बसवलेली आहे. त्याची मदत घेऊन नेत्रहीन व्यक्ती कुठेही न अडखळता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. त्या स्टिकच्या समोर काही अडथळा आला, तर त्या स्टिकमधून बीप साउंड येतो. अडथळा त्या स्टिकपासून खूप जवळ असेल, तर बीप साऊंड मोठा येतो. खूपच जवळ अडथळा असेल तर ती काठी व्हायब्रेटही होते. यामुळे स्टिक घेतलेल्या व्यक्तीला अलर्ट राहून धोका टाळणं शक्य होऊ शकतं. या काठीमध्ये असलेल्या एका बटणामुळे त्या व्यक्तीचं लोकेशन घरच्यांना मिळू शकतं. यामुळे एखादी व्यक्ती हरवली तर ते बटण दाबून ती व्यक्ती कुटुंबीयांना लोकेशन पाठवू शकेल.

    First published:

    Tags: Local18